दक्षिण नागपुरात 'या' समस्यांमुळे अनेक लोक बेजार!
By मंगेश व्यवहारे | Published: October 1, 2023 03:32 PM2023-10-01T15:32:03+5:302023-10-01T15:32:53+5:30
न्यू म्हाळगीनगर येथील मलवाहिनीची अवस्था अतिशय दयनीय आहे. वारंवार चोक होणे, फुटणे या समस्येमुळे लोकं बेजार आहे.
नागपूर : मूसळधार झालेल्या पावसामुळे दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांमध्ये घराघरात पाणी शिरले, पण नुकसानीचे पंचनामे झाले नाही. मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून, नागरीकांना जखमी केल्यानंतरही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही. न्यू म्हाळगीनगर येथील मलवाहिनीची अवस्था अतिशय दयनीय आहे. वारंवार चोक होणे, फुटणे या समस्येमुळे लोकं बेजार आहे.
पावसाळ्याचे पाणी साठण्याऱ्या रिकाम्या प्लॉटवर काहीच कारवाई केली जात नाही, त्याचा परिणामस्वरुप स्थानिक रहिवाश्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. बऱ्याच एरीयामध्ये सफाई कर्मचारी येत नाही, प्रशासनाने लावलेल्या कचरा पेट्या चोरीला गेल्या आहेत. डेंग्यूचा प्रकोप वाढला असताना फवारणी होत नाही. वस्त्यांमध्ये कचरा पडलेला आहे, डुकरांचे प्रमाण वाढलेले आहे.
या समस्यांकडे कुणाचेच लक्ष नसल्याने दक्षिण नागपूर शिवसेने (उबाठा ) तर्फे विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या नेतृत्वात हनुमाननगर झोन पुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी निलिमा शास्त्री, किशोर धोटे, किरण शेळके, विनोद चकोर, कार्तिक नारनवरे, निलेश डहाके, आशिष भोयर, मनिष हरणे, धम्मा सोनटक्के, विष्णू पोटफोडे, रमेश पवार, अनंता देवगीरकर, अर्चना बैस आदी उपस्थित होते.