पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करणार - अब्दुल सत्तार 

By आनंद डेकाटे | Published: December 18, 2023 06:01 PM2023-12-18T18:01:51+5:302023-12-18T18:02:58+5:30

याप्रकरणी अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

In the case of rice storage in Pulgaon, the licenses of the traders will be suspended - Abdul Sattar | पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करणार - अब्दुल सत्तार 

पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करणार - अब्दुल सत्तार 

नागपूर : पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) येथे तीन ट्रकमध्ये ८८ हजार १२५ किलो तांदूळ सापडला आहे. या तांदळाची किंमत ४५ लाख ८६ हजार ९७१ रुपये आहे. याप्रकरणी अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सापडलेला तांदूळ तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच याप्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी विधानसभेत केली.

पुलगाव येथील सापडलेल्या तांदळाबाबत विधानसभा सदस्य रणजित कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पणन मंत्री सत्तार म्हणाले, पोलिसांनी केलेल्या तपासानुसार याप्रकरणी दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून २२ स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील. यावरील चर्चेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाग घेतला.

Web Title: In the case of rice storage in Pulgaon, the licenses of the traders will be suspended - Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.