चिंता वाढली; नागपुरात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 10:13 PM2022-07-05T22:13:54+5:302022-07-05T22:14:20+5:30

वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत असताना कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दुसऱ्यांदा शंभरी गाठल्याने चिंता वाढली आहे.

In two days, the number of corona patients in Nagpur reached one hundred | चिंता वाढली; नागपुरात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठली शंभरी

चिंता वाढली; नागपुरात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठली शंभरी

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्हिटीचा दर ७ टक्क्यांवर

नागपूर : वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत असताना कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दुसऱ्यांदा शंभरी गाठल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी १३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ७९ हजार ४७१ झाली असून, मृतांची संख्या १० हजार ३३९ वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात २४ तासांत १ हजार ८८१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत शहरात ८२ तर, ग्रामीणमध्ये ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर ७.२ टक्क्यांवर गेला आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ७१३, ग्रामीणमध्ये १ लाख ६८ हजार ७६२ तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९ हजार ९९६ झाली आहे. विशेष म्हणजे, २ जुलै रोजी ९५, ३ जुलै रोजी १०५ तर मंगळवारी १३५ रुग्णांची नोंद झाली. शहरासोबत ग्रामीणमध्येही रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

-कोरोनाचे १५ रुग्ण भरती

कोरोनाचे शहरात १८३, ग्रामीणमध्ये ३९८ असे एकूण ५८१ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील ५६६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ८ रुग्ण मेडिकलमध्ये, १ रुग्ण मेयोमध्ये, तर ६ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी शहरातील ८२, ग्रामीण भागातील ५३ असे १३५ रुग्ण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे. आतापर्यंत ५ लाख ६८ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

 

Web Title: In two days, the number of corona patients in Nagpur reached one hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.