मेट्रो हाऊसमध्ये स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:45 AM2017-10-08T01:45:18+5:302017-10-08T01:45:27+5:30

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) सिव्हील लाईन्स येथील मुख्य कार्यालय ‘मेट्रो हाऊस’मध्ये येथील कर्मचाºयांसाठी स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन ....

Inauguration of automatic kiosks in metro house | मेट्रो हाऊसमध्ये स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन

मेट्रो हाऊसमध्ये स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाºयांना संपूर्ण सेवा मिळणार : मोबाईलद्वारे पाहू शकतील रेकॉर्ड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) सिव्हील लाईन्स येथील मुख्य कार्यालय ‘मेट्रो हाऊस’मध्ये येथील कर्मचाºयांसाठी स्वयंचलित कियोस्कचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते शनिवारी झाले.
स्वयंचलित कियोस्क सुरूकरून महामेट्रोने महामेट्रोचे पूर्ण डिजिटायझेशन होण्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महामेट्रोने ५डी बीम-ईआरपी इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मचा समावेश केला आहे. स्वयंचलित कियोस्कमुळे कर्मचाºयांना मानवसंसाधन संबंधित सेवा डिजिटल पद्धतीने आॅनलाईन मिळणार आहे. कर्मचारी एकाच डेटा बेसमध्ये त्यांचे वैयक्तिक रेकॉर्ड हाताळू शकतील आणि मोबाईलद्वारे पाहू शकतील. या स्वयंचलित डिजिटल पोर्टलद्वारे कर्मचाºयांना कार्यकालीन वेळ व उपस्थिती, रजेचे व्यवस्थापन, संस्थेच्या कर्मचाºयांचा डाटा, वैयक्तिक माहिती, फायदे व पेमेंट, प्रवास व्यवस्थापन, कॉपोर्रेट माहित, मूल्यमापन, परतफेड, इन्कम टॅक्स रिटर्न, संस्थेतील पदानुक्रम आदींची माहिती मिळणार आहे. उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे संचालक (वित्त) एस. शिवमाथन, संचालक (प्रकल्प ) महेशकुमार अग्रवाल, संचालक (रोलिंग स्टॉक ) सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि इतर उपस्थित होते.

Web Title: Inauguration of automatic kiosks in metro house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.