‘डायग्नोपिन’डायग्नोस्टिक सेंटर आणि मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:08+5:302021-03-01T04:10:08+5:30
नागपूर : नागपुरात नव्याने सुरू झालेल्या अद्ययावत अशा ‘डायग्नोपिन’ या डायग्नोस्टिक सेंटर आणि मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे रविवारी उद्घाटन झाले. ...
नागपूर : नागपुरात नव्याने सुरू झालेल्या अद्ययावत अशा ‘डायग्नोपिन’ या डायग्नोस्टिक सेंटर आणि मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे रविवारी उद्घाटन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि लोकमत वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. धंतोलीतील राजकमल कॉम्लेक्सच्या तळमजल्यावर या सेवेचा प्रारंभ झाला.
प्रारंभी गडकरी यांनी विजय दर्डा यांच्यासमवेत फित कापून उद्घाटन केले. या युनिटमधील सर्व विभागांची आणि संयंत्रांची पाहणी त्यांनी केली. नागपुरात एकाच छताखाली अद्ययावत आणि अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या. विजय दर्डा यांनीही ‘डायग्नोपिन’च्या सेवेला शुभेच्छा दिल्या. पुणे येथे सुरू असलेल्या वैद्यकीय सेवेनंतर आता नागपुरात ही सेवा संचालक प्रफुल्ल कोठारी आणि नितेश कोठारी देणार आहेत. सेवाभावातून दिल्या जाणाऱ्या या वैद्यकीय सेवेचे त्यांनी स्वागत केले.
प्रारंभी ‘डायग्नोपिन’चे संचालक प्रफुल्ल कोठारी आणि मितेश कोठारी यांनी पाहुण्यांना पुणेरी पगडी घालून आणि शेला देऊन स्वागत केले. या युनिटसंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या तपासण्या आणि दंतचिकित्सा येथे होणार आहे. यासाठी अद्ययावत संयंत्र उपलब्ध आहेत. ब्लड कलेक्शन, ईसीजी, कलर डॉपलर, सोनोग्राफी, स्ट्रेट टेस्ट, डिजिटल एक्स रे, ३२ स्लाईजचे अद्ययावत सिटी स्कॅन, रूट कॅनल ते इनप्लॉंटपर्यंत सर्व प्रकारची सेवा देणारे डेंटल युनिट हे येथील वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी गुरू गौतम संस्थेचे ट्रस्टी सतीश बनवट, गौतम लब्धी फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल नहार, आर्किटेक्ट सुरेश चिचघरे, कुशल जैन, बांधकाम व्यावसायिक राजू इटकेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
...
‘माझी भिंत’ पुस्तकाची भेट
या औपचारिक समारंभादरम्यान लोकमत ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले ‘माझी भिंत’ हे पुस्तक विजय दर्डा यांनी नितीन गडकरी यांना भेट दिले. या पुस्तकाबद्दल आपण ऐकले आहे. आता प्रत्यक्ष वाचन करून लेखी अभिप्राय कळविण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.
...