मध्य रेल्वेत ई-पास मॉड्युलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:42 AM2019-03-24T00:42:39+5:302019-03-24T00:45:02+5:30

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या उपस्थितीत नागपूर विभागाच्या कार्मिक विभागात दोन आयटी मॉड्युलचे उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of E-pass Modules in Central Railway | मध्य रेल्वेत ई-पास मॉड्युलचे उद्घाटन

ई-पास मॉड्युलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि अधिकारी

Next
ठळक मुद्देसेवा पुस्तिकेचा डिजिटल डिस्प्ले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या उपस्थितीत नागपूर विभागाच्या कार्मिक विभागात दोन आयटी मॉड्युलचे उद्घाटन करण्यात आले. यात कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेचा डिजिटल डिस्प्ले आणि ई-पास मॉड्युलचा समावेश आहे. ई-पास मॉड्युलला नागपूर विभागाने विकसित केले आहे. हे वेब अप्लिकेशन सर्व कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे आहे. यात ओटीपी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे. यामुळे कर्मचारी सुरक्षित आणि विश्वसनीय माध्यमाद्वारे केवळ स्वत:ची सेवापुस्तिका पाहू शकणार आहेत. भविष्यात गरजेनुसार आपल्याजवळ सेवा पुस्तिका डाऊनलोड करून ठेवू शकणार आहेत. सेवापुस्तिकेची प्रत काढून जवळ ठेवू शकतील. यामुळे माहिती अधिकाराचे अर्ज कमी होतील. ई-पास मॉड्युलमुळे पास, पीटीओ, वार्षिक पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. या सुविधेमुळे पास कार्यालयातील अनावश्यक गर्दी कमी होणार आहे. नवे कर्मचारी/निवृत्त कर्मचारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात न येताच आपले ऑनलाईन खाते तयार करू शकतील. हे खाते मुख्य कार्यालय, पास अधीक्षकांतर्फे मंजुरी दिलेले राहणार आहे.

 

Web Title: Inauguration of E-pass Modules in Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.