आशा हॉस्पिटलमध्ये विभागातील पहिल्या वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:09+5:302021-05-14T04:08:09+5:30

नागपू : नागपूर जिल्ह्यात कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये विभागातील पहिल्या वैद्यकीय प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ...

Inauguration of the first medical oxygen plant in the department at Asha Hospital | आशा हॉस्पिटलमध्ये विभागातील पहिल्या वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

आशा हॉस्पिटलमध्ये विभागातील पहिल्या वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

Next

नागपू : नागपूर जिल्ह्यात कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये विभागातील पहिल्या वैद्यकीय प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीओ कमल किशोर फुटाणे उपस्थित होते. साथीच्या आजाराच्या रुग्णांसाठी आशा हॉस्पिटलद्वारे केलेल्या कामाचे राऊत यांनी कौतुक केले. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यानंतर रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याची भीती या प्रकल्पामुळे वाटणार नाही आणि रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असल्यास अनुचित घटना होण्याची शक्यता नाही. आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र अग्रवाल म्हणाले, या प्रकल्पामुळे रुग्णालयाला अपुऱ्या ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून राहणे टाळता येईल आणि रुग्णांना २४ तास ऑक्सिजन मिळेल. ९३ टक्के शुद्धतेसह दरदिवशी ८५ ते १०० जम्बो सिलिंडर उत्पादनाची प्रकल्पाची क्षमता आहे. डॉ. सौरभ अग्रवाल म्हणाले, प्रकल्पामुळे सध्याच्या परिस्थितीत जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल. याप्रसंगी सुरेश भोयर, काशीनाथ प्रधान, नीरज लोणारे आणि आशा हॉस्पिटलचे अंकित अग्रवाल, डॉ. संजय गाढे, एमडी फिजिशियन डॉ. गोविंद राठोड, सीईओ रसेल लॉरी, जय हरी सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Inauguration of the first medical oxygen plant in the department at Asha Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.