‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:25 PM2019-11-20T23:25:25+5:302019-11-20T23:26:32+5:30

केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने येथील कृपलानी चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक म्युरलचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

Inauguration of the first mural in the state bearing the message of 'Beti Bachav' | ‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण

‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देमनपा व नागपूर मेट्रोचा उपक्रम : शहराच्या सौंदर्यात भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने येथील कृपलानी चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक म्युरलचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देणारे अशा प्रकारचे हे राज्यातील पहिलेच म्युरल आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
याप्रसंगी महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेविका तारा यादव, पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, श्रद्धा पाठक, वर्षा ठाकरे, भाजपच्या बेटी बचाओ अभियानाचे विदर्भ प्रमुख श्रीकांत देशपांडे, शहर प्रमुख मनीषा काशीकर, हस्तांकितच्या दीप्ती देशपांडे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे आदी उपस्थित होते.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपूर महापालिका मोठ्याप्रमाणावर जनजागृती करीत असते. मुलींचा जन्मदर वाढला आहे. १००० मुलांमागे ९६८मुली असे प्रमाण आता झाले आहे. बेटी बचाओ अभियानाला नागपुरात बळ मिळावे, यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेवर आधारित म्युरल असावे, अशी संकल्पना भाजपच्या बेटी बचाओ अभियानाच्या सदस्यांनी मांडली. त्यानुसार कृपलानी चौकात म्युरल उभारण्यात आल्याची माहिती नंदा जिचकार यांनी दिली.
श्रीकांत देशपांडे म्हणाले, भाजपने बेटी बचाओ अभियानाचे शहरनिहाय स्वतंत्र युनिट तयार केले. या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुरू आहे. महापालिका आणि मेट्रोने पुढाकार घेऊन तयार केलेले म्युरल म्हणजे जनजागृतीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
अनिल कोकाटे यांनीही बेटी बचाओ अभियानाची प्रशंसा केली. म्युरल नागपूर शहराचे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अर्चना डेहनकर यांनीही उपक्रमाची प्रशंसा केली.
मनीषा काशीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बेटी बचाओ अभियानाच्या पदाधिकारी संध्या अधाळे, योगिता धार्मिक, लता होलगरे, ज्योत्स्ना कुरेकर, सुमित्रा सालवटकर, बबिता सालवटकर, उषा पटाले, अनुश्री हवालदार, कुंदा बावणे, कल्पना तडस, सोनाली घोडमारे, यशोधरा टेंभुर्डे, संतोष लढ्ढा, अतुल जोगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of the first mural in the state bearing the message of 'Beti Bachav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.