मास्टर स्टेशनचे आज उद्घाटन
By Admin | Published: August 7, 2016 02:24 AM2016-08-07T02:24:06+5:302016-08-07T02:24:06+5:30
९१.९ एफएम रेडिओ आॅरेंजच्या सर्व सुविधांनी सुसज्ज मास्टर स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात होणार आहे.
रेडिओ आॅरेंजचे प्रसारण : अकोला व बिलासपूर येथे प्रसारण
नागपूर : ९१.९ एफएम रेडिओ आॅरेंजच्या सर्व सुविधांनी सुसज्ज मास्टर स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसकर आणि जयंती मजुमदार उपस्थित राहतील.
रविवारी ५.३० वाजेपासून अकोला आणि बिलासपूर येथे प्रसारण सुरू होणार आहे. अभिजित मजुमदार चॅनलचे प्रशासकीय संचालक आहेत. विदर्भातून मीडिया क्षेत्रात पदार्पण करणारे पहिले व्यावसायिक आहेत. इनु मजुमदार चॅलनचे सीईओ आहेत. समूह पुढील पाच वर्षांत ५० शहरात प्रसारण करणार आहे. रेडिओ स्टेशन मध्य भारतातील सर्वात मोठे असणार आहे. ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ हे चॅनलचे घोषवाक्य आहे. चॅनल कार्यक्रमांना प्रादेशिक तडका राहणार असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील लोकांना निश्चितच आवडणार आहे. चॅनलवर भारतातील पहिले दिव्यांग रेडिओ जॉकी आर.जे. शाहनवाज ‘रात बाकी बात बाकी’ शो सादर करणार आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडेल असे चॅनलचे शो राहतील.
चमूमध्ये १० ते १२ वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ राहतील. काही महिन्यांपूर्वी चॅनलने अकोला, बिलासपूर आणि नागपुरात एक क्रिएटिव्ह आणि तांत्रिक विभागांमध्ये भरतीसाठी मोहीम चालविली होती. १५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी या मोहिमेत भाग घेतला. रेडिओ जॉकीच्या पदासाठी १२ आरजेची निवड करण्यात आली. सर्व आरजे फ्रेशर आहेत आणि श्रोत्यांना त्यांच्या फ्रेश आवाजाला अनुभवण्याची नवीन संधी मिळणार आहे. चॅनलला प्रायोजकांकडून प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल मीडियावर राबविलेल्या मोहिमेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चॅनलचे कार्पोरेट कार्यालय जयंतीनगरी, पूर्ती बाजारावर बेसा रोड, मनीषनगर येथे आहे. (वा.प्र.)