चीन व दुबईच्या तीन विमानांचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:22 AM2018-01-01T10:22:06+5:302018-01-01T10:22:27+5:30

दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

Incidental landing of three aircraft of China and Dubai in Nagpur | चीन व दुबईच्या तीन विमानांचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

चीन व दुबईच्या तीन विमानांचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

Next
ठळक मुद्देदृष्यमानता कमी झाल्याचा बसला फटका

आॅनलाईन लोकमत
नागपूर : उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचा मोठा फटका रविवारी सकाळी विमान सेवेला बसला. दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.
चीनचे चायना साऊथर्न एअरलाईन्सचे विमान क्वांगचो दिल्लीला उतरणार होते, पण कमी दृष्यमानतेमुळे ते सकाळी नागपूर विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय फ्लॉय दुबई कंपनीचे दिल्ली येथे उतरणारे आणि गो-एअरचे हैदराबाद-दिल्ली विमान नागपूर विमानतळावर उतरले. या तिन्ही विमानांनी दीड तासाच्या अंतराने दिल्लीला उड्डाण भरले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने उशिराने उड्डाण करीत असून काहींच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Web Title: Incidental landing of three aircraft of China and Dubai in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.