नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:23 AM2019-03-20T00:23:29+5:302019-03-20T00:24:07+5:30

वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून करण्यात आली आहे.

Incidents of robbery with newspapers Hawkers have increased : terror among Hawker | नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत

नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून करण्यात आली आहे.
वाचकांना सकाळी वृत्तपत्र मिळावे म्हणून वृत्तपत्र विक्रेतेबांधव पहाटेपासून परिश्रम घेतात. कडाक्याची थंडी असो अथवा पावसाचे दिवस असो ही मंडळी पहाटे उठून वेगवेगळ्या ठिकाणी वृत्तपत्रांचे गठ्ठे घ्यायला जातात. तेथून ते वेगवेगळ्या भागातील नागरिकांकडे पोहचवितात. रस्त्यावर कुणी असो नसो वृत्तपत्र विक्रेते मात्र हमखास बघायला मिळतात. हे जाणून असल्यामुळे की काय चोर-लुटारूंनी वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याची मालिका सुरू केली आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या भागात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. माटे चौकात मंगळवारी पहाटे ४ वाजता किरण वाघमारे यांना लुटण्यात आले. त्यापूर्वी कोतवालीत अनिल शाहू यांना लुटण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी बजाजनगरात ओमकेश गर्गे यांनाही मारहाण करून एक हजार रुपये लुटण्यात आले होते. त्याच्या तक्रारीही नोंदविण्यात आल्या; मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये दहशत आणि रोष निर्माण झाला आहे.
आयुक्तांकडून आश्वासन
अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात आणि आरोपींना तातडीने पकडण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची मंगळवारी भेट घेतली.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेशजी नागलकर तसेच मंगेश वासनिक, राकेश आकरे, नीळकंठ निंबर्ते, राम पांडे, राजेंद्र धंगारे, नितीन चतूरकर, अमोल तितरमारे, सुजित नेमाडे, गौतम मेश्राम, राजकुमार नगरारे, अनिल शाहू, नाना गडंलेवार, प्रवीण धार्मिक, मनीष राजनकर, अशोक वाटेकर यांनी लुटमारीच्या घटनांची आयुक्तांना माहिती दिली. आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी योग्य त्या उपाययोजना करून यापुढे अशा घटना घडणार नाही, यासाठी पोलीस प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.

Web Title: Incidents of robbery with newspapers Hawkers have increased : terror among Hawker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.