नागपूर झोनमधून तीन वर्षांत २९.३९ कोटीचा प्राप्तिकर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:32 PM2019-10-30T22:32:52+5:302019-10-30T22:33:42+5:30
प्राप्तिकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात नागपूर झोनमधून २९ कोटी ३९ लाख ५० हजार ५२४ रुपयाचा प्राप्तिकर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राप्तिकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात नागपूर झोनमधून २९ कोटी ३९ लाख ५० हजार ५२४ रुपयाचा प्राप्तिकर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. त्यात सर्वात मोठा वाटा अनिवासी भारतीयांचा आहे.६९६ अनिवासी भारतीयांकडून २८ कोटी २४ लाख रुपयाचा प्राप्तिकर मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षात ६१ करदात्यांनी स्वत:हून प्राप्तिकर जमा केला असून, ती एकूण रक्कम ८६ लाख ५२ हजार ८८९ रुपये आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ५२ करदात्यांकडून २८ लाख ९७ हजार ६३५ रुपये प्राप्तिकर मिळाला आहे. अशाप्रकारे या ११३ करदात्यांकडून १ कोटी १५ लाख ५० हजार ५२४ रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले. सध्या १ लाख ७४ हजार रुपयाचा प्राप्तिकर थकीत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती देण्यात आली आहे.
करदात्यांनी स्वत:हून जमा केलेला प्राप्तिकर
वर्ष करदाते प्राप्तिकर
२०१६-१७ १८ १५,१५,१९९
२०१७-१८ २१ २७,६७,८६८
२०१८-१९ २२ ४३,६९,८२२
अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जमा प्राप्तिकर
वर्ष करदाते प्राप्तिकर
२०१६-१७ १० ७,०७,६४८
२०१७-१८ २१ १२,८२,४८६
२०१८-१९ २२ ९,०७,५०१
मल्टी टास्किंग स्टाफचे पद रिक्त
पदे मंजूर कार्यरत रिक्त
प्राप्तिकर निरीक्षक १ १ ०
कर सहायक २ २ ०
मल्टी टास्किंग स्टाफ १ ० १