धर्मार्थ संस्थांना आयकरचे नियम लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:33 PM2018-08-30T23:33:58+5:302018-08-30T23:35:06+5:30

धर्मार्थ (चॅरिटेबल) संस्थांना आयकराचे नियम लागू असल्याची माहिती चॅरिटेबल संस्थांसंबंधित आयकर कायद्यावरील चर्चासत्रात आयकर विभागाचे सहआयुक्त नाहक यांनी दिली.

Income tax rules apply to charitable organizations | धर्मार्थ संस्थांना आयकरचे नियम लागू 

धर्मार्थ संस्थांना आयकरचे नियम लागू 

googlenewsNext
ठळक मुद्देआयकर सहआयुक्त नाहक : ‘कॅट’ व आयकर विभागातर्फे चर्चासत्र

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्मार्थ (चॅरिटेबल) संस्थांना आयकराचे नियम लागू असल्याची माहिती चॅरिटेबल संस्थांसंबंधित आयकर कायद्यावरील चर्चासत्रात आयकर विभागाचे सहआयुक्त नाहक यांनी दिली.
चर्चासत्राचे आयोजन कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट), नवी दिल्लीच्या वतीने आणि आयकर विभागाच्या सहकार्याने गुरुवारी कॅटच्या सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी नाहक होते. व्यासपीठावर कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, आयकर विभागाचे उपायुक्त एस.एम.व्ही. शर्मा, आयकर अधिकारी सुरेश घुंघरूड व प्रणयकुमार आणि अ‍ॅड. संजय ठाकर उपस्थित होते.
शर्मा यांनी आयकर विभागासमोर आलेल्या निर्णयाच्या आधारावर संस्थांनी कोणती चूक करू नये, यावर माहिती दिली. सुरेश घुंघरूड यांनी पॉवर पार्इंट सादरीकरणाच्या माध्यमातून संस्थेची नोंदणी, आॅडिट, रिटर्न फायलिंग आदींवर विस्तृत सांगितले. तर प्रणयकुमार यांनी संस्थांसंदर्भात टीडीएसच्या तरतुदींवर माहिती दिली.
बी.सी. भरतीया म्हणाले, आता संस्थांनाही दक्ष राहून आयकर नियमांचे पालन करावे लागेल. हे चर्चासत्र म्हणजे विभागातर्फे भविष्यात होणाऱ्या कठोर कारवाईचे संकेत आहेत. भविष्यात आयकर अधिनियमांतर्गत कारवाईपासून बचाव करण्यासाठी चर्चासत्राचा फायदा सर्व धर्मार्थ संस्थांच्या ट्रस्टींनी घ्यावा.
ठाकर म्हणाले, असे माहितीपर कार्यक्रम नियमित व्हावेत. पूर्वी आम्हाला सर्व कामांसाठी आयकर विभागाकडे जावे लागत होते, पण आता आयकर विभाग करदात्यांकडे येत आहे. हा चांगला बदल आहे.
संचालन निखिलेश ठाकर यांनी केले तर किशोर धाराशिवकर यांनी आभार मानले. चर्चासत्रात राधाकृष्ण हॉस्पिटलचे मथुराप्रसाद गोयल, गोविंद पोद्दार, शंकरलाल जालान फाऊंडेशनचे शंकरलाल जालान, कच्छ पाटीदार समाजाचे अध्यक्ष नरसिंहभाई पटेल, वैश्य लाड वनिक समाजाचे कमलेश लाड, राष्ट्रीय महिला विकास कल्याण समितीच्या स्वप्ना तलरेजा, नागपूर गुजराती ब्रम्ह समाजाचे अशोक त्रिवेदी, आर.डी. मेहता, प्रभाकर देशमुख, हालार मेमन जमातचे फारूखभाई अकबानी, भक्ती काजंन्स परिवाराचे महेशकुमार कुकरेजा, जाल फाऊंडेशनचे परसीद जाल, आर.डी. पारेख,, ए.के. सोनी, आसिफ अकबानी, रमेश उमाटे, अंकित राठी, अ‍ॅड. जे.एस. बदानी, जगदीश गोरसिया, जगदीश गुप्ता, वीरल कोठारी, क्रिष्णादास लाड उपस्थित होते.

Web Title: Income tax rules apply to charitable organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.