जमिनीवरील मेट्रोसाठी पीएससी स्लीपर्सची आवक
By admin | Published: January 29, 2017 02:31 AM2017-01-29T02:31:12+5:302017-01-29T02:31:12+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत अॅटग्रेड सेक्सन अर्थात जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या साईटवर ट्रॅक टाकण्यासाठी
Next
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत अॅटग्रेड सेक्सन अर्थात जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या साईटवर ट्रॅक टाकण्यासाठी पीएससी स्लीपर्सची पहिली खेप पोहोचली आहे.
मेट्रो रेल्वे ५.६ कि़मी. विमानतळ ते मिहानपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. त्याचा मार्ग तयार करण्यासाठी गिट्टी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यावर स्लीपर्स टाकण्यात येणार आहे. एका स्लीपरची लांबी २.५० मीटर आणि वजन २५० किलो आहे. स्टॅण्डर्ड गेज रेल्वे ट्रॅकनुरूप आहे.
पीएससी स्लीपर्स प्रत्येक ६०० मि.मी. आणि ६५० मि.मी. मुख्य मार्ग आणि डेपो लाईनदरम्यान ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)