कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:22+5:302020-11-26T04:22:22+5:30
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मागील तीन दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. ...
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मागील तीन दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. दुसरीकडे अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हा दर ३.९६ टक्क्यांवर पोहचला आहे. मंगळवारी ३५६ रुग्ण व ११ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १०९५६१ तर मृतांची संख्या ३६१५ झाली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. आज ५८९८ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर तर १२८६ संशयित रुग्णांची रॅपीड अँटीजेन असे एकूण ७१८४ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत ४.९५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकूण ७४५०३४ चाचण्या झाल्या असून १४.७० टक्के बाधित रुग्ण आढळून आले. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २६६, ग्रामीणमधील ८६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील चार, ग्रामीणमधील तीन तर जिल्हाबाहेरील चार आहेत. बाधितांच्या तुलनेत आजही कमी, १३३ रुग्ण बरे झाले. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.७३ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी अॅक्टीव्ह म्हणजे क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ३.८१ टक्के होते. २५ दिवसात यात किंचित वाढ होऊन ती ३.९६ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ४३४५ रुग्ण उपचाराखाली आहेत. सर्वाधिक २०० रुग्ण मेडिकलमध्ये तर ८९ रुग्ण मेयोमध्ये दाखल आहेत.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ७१८४
-बाधित रुग्ण : १०९५६१
_-बरे झालेले : १०१६०१
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४३४५
- मृत्यू : ३६१५