कोरोना रुग्णांसाठी खाटा व व्हेंटिलेटर वाढवा : अनिस अहमद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:45 PM2020-09-10T21:45:32+5:302020-09-10T21:46:45+5:30

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयूमध्ये खाटा वाढवण्यासोबतच मेयो, मेजिकल व एम्समध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे.

Increase beds and ventilators for corona patients: Anis Ahmed | कोरोना रुग्णांसाठी खाटा व व्हेंटिलेटर वाढवा : अनिस अहमद

कोरोना रुग्णांसाठी खाटा व व्हेंटिलेटर वाढवा : अनिस अहमद

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयूमध्ये खाटा वाढवण्यासोबतच मेयो, मेजिकल व एम्समध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिस अहमद यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांची भेट घेऊन चर्चा केली.
अनिस अहमद यांनी यावेळी सांगितले की, शासकीय रुग्णालयांवरच बहुतांश रुग्णांचा भार आहे. दुसरीकडे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड मिळण्यास अडचणी येत आहेत. मेयो, मेडिकल व एम्समध्ये जवळपास १२०० बेड आहेत. यापैकी ३५० बेड अयसीयू किंवा एचडीयू बेड आहेत. याचा उपयोग सामान्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी होत नाही. ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाही बेड मिळत नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात ही परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते, तेव्हा राज्य सरकारने या दिशेने तातडीने आवयक पाऊल उचलण्याची गरज आहे. यावेळड़ी प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, अ‍ॅड. नफीस व सय्य मुमताज हे सुद्धा उपस्थित होते.

Web Title: Increase beds and ventilators for corona patients: Anis Ahmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.