१०व्या दिवशी कोरोनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:10+5:302021-08-25T04:12:10+5:30

नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट आली असली तरी मागील १० दिवसांपासून पाचच्या आत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या मंगळवारी सातवर ...

Increase in corona on 10th day | १०व्या दिवशी कोरोनात वाढ

१०व्या दिवशी कोरोनात वाढ

Next

नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट आली असली तरी मागील १० दिवसांपासून पाचच्या आत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या मंगळवारी सातवर पोहोचली. विशेष म्हणजे, हे सर्व रुग्ण शहरातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९९६ झाली असून, मागील १३ दिवसांपासून मृत्यू संख्या १०,११८ वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ४,९७६ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.१ टक्के आहे. आतापर्यंत ३३,८९,६०६ चाचण्या झाल्या आहेत. त्यातून १४.५४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मागील २४ दिवसांत आतापर्यंत सर्वाधिक १२ रुग्णांची नोंद ५ ऑगस्ट रोजी झाली. त्यानंतर १०च्या आत रुग्ण होते. १६ ते २४ ऑगस्टदरम्यान आज पहिल्यांदाच रुग्णांची संख्या पाचवर गेली. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ४,८६,१८० असून, मृतांची संख्या ८,४९६ आहे. तर इतर जिल्ह्याबाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या ६,८१६ असून, मृतांची संख्या १,६२२ आहे. आज ८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४,८२,८०६ झाली आहे. सध्या कोरोनाचे ७२ रुग्ण सक्रिय आहेत. यातील १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

- सात दिवसांपासून ग्रामीणमध्ये शून्य रुग्ण व मृत्यू

१८ ते २४ ऑगस्ट या सलग सात दिवसांपासून ग्रामीणमध्ये शून्य रुग्ण व मृत्यूची नोंद आहे. ग्रामीणमध्ये आतापर्यंत १,४६,१२४ रुग्ण व २,६०३ मृत्यूची नोंद झाली आहे. येथील १,४३,५१८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाचे केवळ ३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

:: कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ४,९७६

शहर : ७ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण : ४,९२,९९६

एकूण सक्रिय रुग्ण : ७२

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,८०६

एकूण मृत्यू : १०,११८

Web Title: Increase in corona on 10th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.