कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मात्र जिल्ह्यात शून्य मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:09 AM2021-02-08T04:09:19+5:302021-02-08T04:09:19+5:30

नागपूर : जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच रविवारी शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३६० वर ...

Increase in corona infections, but zero deaths in the district | कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मात्र जिल्ह्यात शून्य मृत्यू

कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मात्र जिल्ह्यात शून्य मृत्यू

googlenewsNext

नागपूर : जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच रविवारी शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३६० वर पोहोचली. विशेष म्हणजे, सोमवारपासून मनपाच्या हद्दीतील शाळेतील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागपूर जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या १३६०९८, तर मृतांची संख्या ४१९२ वर पोहोचली आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ३०० ते ३५० दरम्यान होती. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या कमी होऊन २०० ते २५० दरम्यान आली; परंतु रविवारी बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली. यात शहरातील ३२७, ग्रामीण भागातील ३१ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. आज कोरोना चाचण्याही कमी झाल्या. ३१९० आरटीपीसीआर, तर २०९ रॅपिड अँटिजन मिळून ३३९९ चाचण्या झाल्या. या चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १०.५९ टक्क्यांवर गेला आहे.

- ४१९ रुग्ण बरे

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली, तरी ४१९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयामधून घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. आतापर्यंत १२८६७८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३२२८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ९६१ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयांत भरती असून २२६७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९४.५५ टक्के आहे.

-दैनिक संशयित : ३३९९

-बाधित रुग्ण : ३३९९

_-बरे झालेले : १२८६७८

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३२२८

- मृत्यू : ४१९२

Web Title: Increase in corona infections, but zero deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.