जलयुक्त शिवार अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:12 PM2018-10-30T23:12:07+5:302018-10-30T23:14:26+5:30

दोन वर्षांपासून अनियमित व अपुऱ्या पावसामुळे सरासरी पडणाऱ्या पावसात मागील वर्षी २० टक्के तर यावर्षी १२.६३ टक्के घट झाली आहे. सरासरी पडणाऱ्या पावसाच्या भूजलातील स्थिर पाण्याच्या पातळीत जिल्ह्यातील कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भूजलातील पातळी वाढण्यासोबतच स्थिर राहण्यास मदत झाली आहे.

Increase in ground water level due to effective implementation of Jal Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत वाढ

जलयुक्त शिवार अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत वाढ

Next
ठळक मुद्देकामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांपासून अनियमित व अपुऱ्या पावसामुळे सरासरी पडणाऱ्या पावसात मागील वर्षी २० टक्के तर यावर्षी १२.६३ टक्के घट झाली आहे. सरासरी पडणाऱ्या पावसाच्या भूजलातील स्थिर पाण्याच्या पातळीत जिल्ह्यातील कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भूजलातील पातळी वाढण्यासोबतच स्थिर राहण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील तीन वर्षांपासून सरासरी अपुऱ्या पडणाऱ्या पावसानंतरही भूजलाची पातळी कायम स्थिर राहणे शक्य झाले आहे. जलयुक्त शिवारच्या उपलब्ध पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात श्वाश्वत सिंचनाचा लाभ मिळत आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवारच्या कामामुळे जिल्ह्यात २५ हजार ४८५ टीएमसी एवढा पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला दोनवेळा सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतातील पिके वाचविण्यास मोठी मदत झाली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरासरी सप्टेंबर २-१८ पर्यंतचे पर्जन्यमान व पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केले आहे. १११ निरीक्षण विहिरींच्या निश्चित केलेल्या पाण्याच्या स्थिर पातळीची नोंद करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ९८८.५४ मिलिमीटर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जून ते सप्टेंबर पर्यंत ८६८.७५ मिलिमीटर पाऊस पडला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत ११९.७९ मिलिमीटर कमी पाऊस म्हणजे १२.६३ टक्के घट झाली आहे. घट झालेल्या तालुक्यांमध्ये नागपूर ग्रामीण, हिंगणा, काटोल, नरखेड, कळमेश्वर, मौदा, पारशिवनी, उमरेड, कुही आणि भिवापूर या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २२० गावात ३ हजार ५११ कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार ३२० कामे पूर्ण झाल्यामुळ पावसाचे पाणी अडवून जलयुक्तच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्वाश्वत सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे भूजलाची पातळी स्थिर राहू शकली. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरला आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्त्वाच्या नोंदी समोर आल्यात. त्यामध्ये निरीक्षण विहिरीमधील सप्टेंबर २०१८ मधील सरासरी पाण्याची स्थिर पातळी मागील सात वर्षांच्या तुलनेत केवळ सरासरी ०.०६ ते १ मीटर पेक्षाही कमी आढळून आलेल्या तालुक्यामध्ये भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, कुही, नागपूर, नरखेड, रामटेक, उमरेड या तालुक्यांचा समावेश आहे. सरासरी १.०४ मीटरपर्यंत वाढ झालेल्या तालुक्यांमध्ये कामठी, मौदा, सावनेर व पारशिवनी या तालुक्यात वाढ आढळून आली आहे. भूजलाच्या सातत्याने व अतिवापरामुळे भूजल कमी आढळून आले असले तरी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जलयुक्त शिवारच्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होणे व सातत्याने कायम राहणे सहज शक्य झाले आहे.

तालुक्यांमध्ये अशी झाली वाढ
पर्जन्यमान नंतरच्या सन २०१४ व २०१८ च्या पाणी पातळीचा निरीक्षण विहिरीनिहाय तुलनात्मक अभ्यासामध्ये २०१४ मध्ये ३.०४ पाणी पातळी होती तर २०१८ मधील पाणीपातळी ३.६० म्हणजेच ०.५६ टक्क्याने वाढ झाली आहे. भूजलाच्या सरासरी वाढ झालेल्या तालुक्यांमध्ये उमरेड, मौदा, भिवापूर, कुही, कामठी या तालुक्यात ०.२५ टक्के तर रामटेक, नरखेड, हिंगणा, नागपूर, काटोल, कळमेश्वर या तालुक्यात ०.६६ ते १.५६ टक्के वाढ दिसून आली. सावनेर व पारशिवनी या तालुक्या अल्पशी घट आढळून आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. श्रीमती वर्षा माने यांनी दिली.

Web Title: Increase in ground water level due to effective implementation of Jal Shivar Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.