सुरक्षा वाढवा नाही तर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:40 AM2018-05-22T01:40:25+5:302018-05-22T01:40:39+5:30
रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेचे पडसाद आता नागपुरातही उमटू लागले आहे. सोमवारी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या घटनेचा निषेध करीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. यात २४ तासांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची व पास प्रणाली यंत्रणा गंभीरतेने राबविण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेचे पडसाद आता नागपुरातही उमटू लागले आहे. सोमवारी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या घटनेचा निषेध करीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. यात २४ तासांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची व पास प्रणाली यंत्रणा गंभीरतेने राबविण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जे.जे. रुग्णालयात एका रुग्णाच्या चौघा नातेवाईकांनी अचानक दोन निवासी डॉक्टरांना लक्ष्य केलं. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. याचा निषेध सर्वत्र होत आहे. या घटनेला घेऊन व गेल्या वर्षभरात मेडिकलमध्ये डॉक्टरांवरील तीन हल्ल्याच्या घटनेला घेऊन ‘मार्ड’ संघटनेने डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे पत्र दिले. पत्रात, महाराष्टÑ सुरक्षा सेवा बलाच्या (एमएसएसएफ) जवानांची संख्या ६२ आहे, ती वाढवून १२८ करण्याची मागणी केली आहे. तसेच, ज्या वॉर्डात रुग्णांची खूप जास्त गर्दी असते अशा वॉर्डात, शस्त्रक्रियागृहात व कॅज्युअल्टी येथे कठोरतेने पास प्रणाली
राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. २४ तासांत या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असा इशाराही ‘मार्ड’ने दिला आहे.