सिंचन प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:46+5:302021-08-01T04:08:46+5:30

बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाटबंधारे विभागाच्या सावनेर उपविभागांतर्गत येणाऱ्या १३ सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मागील आठवड्यापर्यंत ...

Increase in water level in irrigation project | सिंचन प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ

सिंचन प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ

Next

बाबा टेकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पाटबंधारे विभागाच्या सावनेर उपविभागांतर्गत येणाऱ्या १३ सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मागील आठवड्यापर्यंत चिंताजनक हाेती. मात्र, चालू आठवड्यात काेसळलेल्या पावसामुळे या प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ हाेत असल्याने भविष्यात गुरांसह पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शिवाय, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने सावनेर व खापा नगर परिषदेसाेबतच तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठ्याचा तसेच उद्याेगांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. आठवडाभर काेसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत.

केसरनाला प्रकल्पाची एकूण क्षमता ३६२.९० दलघमी असून, त्यात ७४.३० टक्के पाणीसाठा आहे. कोलारची क्षमता ३६३.९० दलघमी असून, त्यात ९८.३४ टक्के, खेकरानालाची क्षमता ३३३.३० दलघमी असून, त्यात ६५.११ टक्के, माहूरकुंडची क्षमता ३६७.०५ दलघमी असून, त्यात ६०.९५ टक्के, नागलवाडीची क्षमता ३८४.१० दलघमी असून, त्यात ४९.३३ टक्के, कान्हादेवीची क्षमता ३४८.२० दलघमी असून, त्यात ३५.७२ टक्के, सुवरधराची क्षमता ३११.७५ दलघमी असून, त्यात ३४.२८ टक्के, भागीमाहरीची क्षमता ३२१.२० दलघमी असून, त्यात ४३.३८ टक्के, रायबासाची क्षमता ३७४.३६० दलघमी असून, त्यात १०० टक्के, खुमारीनालाची क्षमता ३४९.१० दलघमी असून, त्यात ७६.८० टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी या काळात एकही जलाशय पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. या वर्षी भागीमाहरी बॅरेजची अवस्था थाेडी चिंताजनक आहे. यातील काही जलाशये १०० टक्के भरल्याने त्यांच्या आऊट फ्लाेमुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी व नाल्याकाठच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ हाेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

...

१०० टक्के भरलेली जलाशये

पाटबंधारे विभागाच्या सावनेर उपविभागातील उमरी, रायबासा व नांदा ही तीन जलाशये पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरली आहेत. उमरी प्रकल्पाची क्षमता ३७७ दलघमी असून, रायबासाची क्षमता ३७४.३६० दलघमी तर नांदा जलाशयाची क्षमता ४०८ दलघमीची आहे. भागीमाहरी बॅरेजची क्षमता ३२६.२० दलघमी असून, त्यात केवळ ११.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उमरी जलाशयाचा आऊट फ्लाे पाच तर रायबासा व नांदा जलाशयाचा आऊट फ्लाे तीन सेंटिमीटरने सुरू आहे.

...

मागील वर्षीची स्थिती

२९ जुलै २०२० राेजी केसरनालामध्ये ५०.७१ टक्के, उमरी ६८.१४ टक्के, कोलार ५५.१५ टक्के, खेकरानाला ७०.०४ टक्के, माहुरकुंड ३३.३५ टक्के, नागलवाडी ३१.०३ टक्के, कान्हादेवी ४४.३६ टक्के, सुवरधरा २५.६० टक्के, भागीमाहरी ११.२४ टक्के, रायबासा ३४.२८ टक्के, खुमारीनाला २९.९१ टक्के, नांदा ४३.२७ टक्के तर भागीमाहरी जलाशयात १८.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक हाेता. या वर्षी खेकरानाला, रायबासा व नांदा जलाशय तीन दिवसांच्या पावसाचे ओव्हरफ्लाे झाले आहेत.

Web Title: Increase in water level in irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.