रस्त्यामधील विद्युत खांबामुळे वाढले अपघात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:09+5:302021-05-29T04:07:09+5:30
नागपूर : झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रोड पूर्ण झाला असून, रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबामुळे वाहतुकीची कोंडी होत ...
नागपूर : झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रोड पूर्ण झाला असून, रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विद्युत खांबामुळे ६० फुटाचा असलेला रस्ता ३० फुटाचा झाला असून, हा विद्युत खांब हटविण्याची मागणी होत आहे.
झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रोड तयार करीत असताना विद्युत विभागाने रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब काढणे गरजेचे होते. परंतु हे खांब न काढल्यामुळे वाहनचालकांना ३० फुटाचा रस्ताच वापरासाठी मिळत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. झिंगाबाई टाकळी ते गोधनी या मार्गावर बोखारा, चक्कीखापा, बैलवाडा, लोणारा, गुमथळा येथे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. रस्त्यात विद्युत खांब असल्यामुळे अनेक वाहने या खांबाला धडकून अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत खांब आणि डीपी हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विद्युत खांब आणि डीपी न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय भिलकर, पापाजी शिवपेठ, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, सुभाष मानमोडे, जगदीश गमे, अजय इंगोले, संजय मांगे, राजेंद्र बढीये, निखिल कापसे, योगेश पेठे, अजय गोडबोले, सुनील धनजोडे, सुमित दांडे, विजय गायधने यांनी दिला आहे.
..............