डीआरएम कार्यालयात कोरोनाचा संसर्ग वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:26+5:302021-04-26T04:07:26+5:30
नागपूर - रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून, बाधितांचा आकडा वाढत आहे. रेल्वेची कार्यप्रणाली सुरू ठेवण्यासाठी मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम ...
नागपूर - रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून, बाधितांचा आकडा वाढत आहे. रेल्वेची कार्यप्रणाली सुरू ठेवण्यासाठी मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरू आहे, तर सर्व प्रशासकीय कामे हाताळणारे डीआरएम कार्यालय मागील आठवड्याभरापासून जवळपास बंदच आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आतापर्यंत सुमारे ९०० रेल्वे कर्मचारी बाधित झाले आहेत. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेत हाच आकडा ७०० इतका आहे. डीआरएम कार्यालय हे रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मुख्यालय आहे. त्यामुळे तेथे कर्मचाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. स्थितीची गंभीरता लक्षात घेता, मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे डीआरएम कार्यालय आठवड्याभरापासून बंदच आहेत. बोटावर मोजण्याइतके कर्मचारी कार्यालयात येत आहेत. पुढील काही दिवस अशाच पद्धतीने काम चालेल. त्यानंतर कार्यालय सुरू करण्याबाबत निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.