कोरोनाच्या रुग्णासोबतच मृत्यूच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:26 AM2020-12-04T04:26:28+5:302020-12-04T04:26:28+5:30
नागपूर : ऑक्टोबरनंतर कमी होऊ लागलेली रुग्णसंख्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात ...
नागपूर : ऑक्टोबरनंतर कमी होऊ लागलेली रुग्णसंख्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात दुसऱ्यांदा रुग्णसंख्या ५००वर गेली. गुरुवारी ५३६ नव्या रुग्णांची भर पडली. मृतांच्या संख्येतही वाढ झाली. १५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३७०७ झाली. बाधितांची एकूण संख्या ११३२६९ वर पोहचली आहे.
कोरोनाबाधितांमध्ये होत असलेली वाढ केवळ शहरात नाही तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे. शहरात आज ४४१, ग्रामीण भागात ९२ तर जिल्हा बाहेरील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील ५ तर जिल्हाबाहेरील ३ आहेत. मागील काही दिवसात ५ हजाराखाली गेलेली चाचण्यांची संख्या गुरुवारी वाढली. ६६११ चाचण्या झाल्या. यात ४८२७ आरटीपीसीआर तर १७८४ रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. अँटिजेन चाचण्यातून ३९ तर आरटीपीसीआरमधून ४९७ रुग्ण आढळून आले. एम्सच्या प्रयोगशाळेत १७, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ७७, मेयोच्या प्रयोगशाळेत ७४, माफसूच्या प्रयागशाळेत १३, नीरीच्या प्रयोगशाळेत ३१, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ७६ तर खासगी लॅबमधून २०९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज ३०७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १०४१३७ वर गेली आहे.
- रुग्णांची खासगीकडे धाव
कोरोनाबाधितांमध्ये होत असलेली वाढ आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आमदार निवासातील बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी मेडिकलमधील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मागील चार महिन्याच्या कालावधीत पहिल्यांदाच भरती रुग्णसंख्या २०० च्या खाली आली. सध्या १७६ रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोमध्ये ५५ तर एम्समध्ये ५१ असे एकूण २८२ रुग्ण आहेत. तर खासगीमध्ये १२८७ रुग्ण भरती आहे. दरम्यानच्या काळात ही संख्या हजाराखाली गेली होती. होम आयसोलेशनमध्ये ३८५७ रुग्ण आहेत.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ६६११
-बाधित रुग्ण : ११३२६९
_-बरे झालेले : १०४१३७
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५४२५
- मृत्यू : ३७०७