पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 06:49 PM2018-07-14T18:49:08+5:302018-07-14T18:50:54+5:30

नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार व त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. पोलीसांनी केलेल्या आरोग्याच्या तपासणीत बहुतांश पोलिसांचे बीपी-शुगर वाढले आहे. तर आमदारांच्या तपासणीत त्यांचा तणाव वाढल्याचे जाणविले आहे.

Increased police BP Sugars, increased tension of MLAs | पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन

पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर अधिवेशनात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार व त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. पोलीसांनी केलेल्या आरोग्याच्या तपासणीत बहुतांश पोलिसांचे बीपी-शुगर वाढले आहे. तर आमदारांच्या तपासणीत त्यांचा तणाव वाढल्याचे जाणविले आहे.
या आमदारांमध्ये मधुकर खडसे, बबन शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण पोटे, हरिभाऊ राठोड, योगेश सागर, जोगेंद्र कवाडे, प्रवीण पोटे, साहेबराव कांबळे, राजन साळवी, रामचंद्र अवसरे, सुनील शिंदे, मंदा म्हात्रे, नरेंद्र पवार आदींचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात येणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन परिसरात छोटेखाणी रुग्णालय सुरू केले आहे. येथे पोर्टेबल व्हेंटीलेटर, डी-फीब्रीलेटर, ईसीजी आदीची सोय आहे. रुग्णांवर निशुल्क औषधोपचार करण्यात येतो. पावसाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून या रुग्णालयात दररोज २०० रुग्णांची ओपीडी आहे. आतापर्यंत ११०० रुग्णांची नोंद झाली आहे.
या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे डायरीयाचे आहे. फंगस इनफेक्शनही बहुतांश रुग्णांना आढळले आहे. अनेकांना गळ्यामध्ये इनफेक्शन झाले आहे. तापाचे रुग्ण आढळले आहे.
 मोठ्या संख्येने आजारी पडण्याला कारण म्हणजे वातावरणाचा परिणाम आहे. आम्ही रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याबरोबर आवश्यक वाटल्यास त्यांना मेयो मध्ये भरती करण्याची सुद्धा सोय केली आहे.
डॉ. कपिल राऊत, सहयोगी प्राध्यापक

 

Web Title: Increased police BP Sugars, increased tension of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.