लाचखोरांच्या शिक्षेचे वाढले प्रमाण

By admin | Published: November 14, 2014 12:52 AM2014-11-14T00:52:47+5:302014-11-14T00:52:47+5:30

लाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक

Increased proportion of the punishment of the bribery | लाचखोरांच्या शिक्षेचे वाढले प्रमाण

लाचखोरांच्या शिक्षेचे वाढले प्रमाण

Next

राहुल अवसरे - नागपूर
लाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार चालू वर्षी आतापर्यंत १९२ प्रकरणांपैकी ६१ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून १३१ प्रकरणे निर्दोष ठरली आहेत. शिक्षा होण्याची टक्केवारी ३२ एवढी आहे.
२०१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा आणि ३०७ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटल होते. ही टक्केवारी २१ होती. शिक्षेच्या टक्केवारीत ११ ने वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ३७६ मध्ये निर्दोष आणि ११८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २४ होती. २०११ मध्ये एकूण ३८३ प्रकरणांपैकी ९० मध्ये शिक्षा तर २९३ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती. २०१० मध्ये ३५३ प्रकरणांपैकी ६८ मध्ये शिक्षा तर २८५ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १९ होती. २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणांपैकी १०६ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. तर ३६० प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेची टक्केवारी २३ होती.
नांदेडमध्ये शिक्षेचे प्रमाण सर्वाधिक
लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक आहे. चालूवर्षी एकूण ८ प्रकरणांपैकी ४ प्रकरणात शिक्षा आणि ४ प्रकरणे निर्दोष सुटली आहेत. शिक्षेची टक्केवारी ५० आहे. २०१३ मध्ये २२ पैकी ५ मध्ये शिक्षा आणि १७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती.
२०१२ मध्ये ३३ पैकी ९ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये २२ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा आणि १९ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १४ होती. २०१० मध्ये १९ पैकी १४ प्रकरणे निर्दोष तर ५ मध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २६ होती. २००९ मध्ये ३४ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा आणि २७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २१ होती.
अमरावतीमध्ये शिक्षेचे प्रमाण १४ टक्के
अमरावती परिक्षेत्रात लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण सर्वात कमी १४ टक्के आहे.
चालू वर्षी २१ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा तर १८ मध्ये आरोपी निर्दोष सुटले. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा तर ३१ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले. शिक्षेची टक्केवारी ३३ होती. २०१२ मध्ये ६२ पैकी १७ मध्ये शिक्षा तर ४५ प्रकरणे निर्दोष होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये ३७ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. शिक्षेची टक्केवारी १६ होती. २०१० मध्ये ३४ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि २८ प्रकरणे निर्दोष ठरली होती. ही टक्केवारी १८ होती. २००९ मध्ये ३३ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २६ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले होते. ही टक्केवारी २१ होती.
नागपुरात शिक्षेच्या प्रमाणात सुधारणा
नागपुरात शिक्षा होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. चालू वर्षी शिक्षेचे प्रमाण २४ टक्के आहे. एकूण ३८ प्रकरणांपैकी आरोपींना ९ मध्ये शिक्षा तर २९ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. २०१३ मध्ये ३५ पैकी ७ मध्ये शिक्षा तर २८ प्रकरणे निर्दोष होती. ही टक्केवारी २० होती. २०१२ मध्ये ३९ पैकी ३२ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष होते तर ७ मध्ये शिक्षा झाली होती. शिक्षेचे प्रमाण १८ टक्के होते. २०११ मध्ये ४८ पैकी १३ मध्ये शिक्षा तर ३५ प्रकरणे निर्दोष होती. टक्केवारी २७ होती. २०१० मध्ये ३८ पैकी ६ प्रकरणात शिक्षा तर ३२ प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेचे प्रमाण १६ टक्के होते. २००९ मध्ये ८९ पैकी २५ मध्ये शिक्षा तर ६४ प्रकरणातील आरोपी निर्दोष होते. ही टक्केवारी २८ होती.

Web Title: Increased proportion of the punishment of the bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.