वर्धा, भंडारा, चंद्रपूरमध्ये वाढतेय रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:28+5:302021-03-25T04:08:28+5:30
नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत असून सातत्याने आकडे वाढतच आहेत. पहिल्या लाटेदरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या ...
नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत असून सातत्याने आकडे वाढतच आहेत. पहिल्या लाटेदरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या नियंत्रित होती, तेथे संसर्ग वाढू लागला आहे. वर्धा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात वेगाने रुग्ण वाढत आहेत. नागपूरमध्येदेखील बुधवारी रुग्णांची संख्या सहाशेहून अधिकनी वाढली. २४ तासात विदर्भात ६ हजार ९७० नवे बाधित आढळले व तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू व बाधितांचे प्रमाण वाढत आहे. दिवसेंदिवस स्थितीत गंभीर होत असून दुसरी लाट जास्त धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात परत ४० बाधितांचे मृत्यू झाले. तर रुग्णसंख्या ३ हजार ७१७ इतकी होती. वर्धा जिल्ह्यात ५९ रुग्ण वाढले व ३०८ इतकी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली तर चार जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये २७६ रुग्ण नोंदविण्यात आले. २४ तासांत तेथील रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात २१९ रुग्ण आढळले व एकाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात काहीसा दिलासा मिळाला. बुधवारी तेथे ४४० रुग्ण नोंदविण्यात आले व ८ जणांचे बळी गेले. बुलडाण्यात परत साडेआठशेहून अधिक रुग्ण आढळले. तेथे ८५५ रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यात ३८१ रुग्ण नोंदविण्यात आले व दिवसभरात सहा जणांचे मृत्यू झाले.
जिल्हा : मृत्यू
नागपूर : ३,७१७ : ४०
गोंदिया : ५० : ००
भंडारा : २१९ : ०१
चंद्रपूर :२७६ :००
वर्धा : ३०८ : ०४
गडचिरोली : ३९ : ०१
अमरावती : ३८१ : ०६
यवतमाळ : ४४० : ०८
वाशिम : २७८ : ०२
बुलडाणा : ८५५ : ००
अकोला : ४०७ : ०४