विदर्भात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:46+5:302021-02-26T04:10:46+5:30

नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गुरुवारी विदर्भात ३,१८१ नव्या रुग्णांची भर पडली तर २६ रुग्णांचे जीव ...

Increasing prevalence of corona in Vidarbha | विदर्भात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

विदर्भात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

Next

नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गुरुवारी विदर्भात ३,१८१ नव्या रुग्णांची भर पडली तर २६ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या ३,१०,३८० तर मृतांची संख्या ७,३१७ वर पोहचली. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा अमरावती जिल्ह्यात ९०६ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली तर, नागपूर जिल्ह्यात पुन्हा हजारावर रुग्णांची संख्या गेली. १,११६ बाधितांची नोंद व १३ बळी गेले. नागपूर विभागात नागपूर व वर्धा जिल्हा सोडल्यास चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. परंतु रुग्णवाढीचा वेग कमी आहे. त्या तुलनेत अमरावती विभागात कोरोनाने वेग पकडला आहे. अमरावतीसह बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून स्थिर आहे.

जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू

नागपूर १११६ १४६८३१ १३

भंडारा २० १३५६८ ००

वर्धा १७३ ११८५७ ०१

गोंदिया २४ १४३८९ ००

गडचिरोली ०८ ९४९० ००

चंद्रपूर ४२ २३५१३ ००

अमरावती ९०६ ३२८०१ ०६

अकोला २०९ १५०१२ ०२

यवतमाळ १४० १६८५६ ०३

बुलडाणा ३०८ १७५८८ ०१

वाशिम २३५ ८४७५ ००

Web Title: Increasing prevalence of corona in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.