विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक : त्या शिक्षकाचे अखेर निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 08:47 PM2018-12-04T20:47:58+5:302018-12-04T20:49:17+5:30
काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि.प.माध्यमिक कन्या शाळेतील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक केल्याच्या तक्रारी होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि.प.माध्यमिक कन्या शाळेतील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक केल्याच्या तक्रारी होत्या.
शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेच्या तक्रारपेटीमधून तक्रारी करून मुख्याध्यापक व सीईओंकडे कारवाईची मागणी केली होती़ या प्रकाराची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक शाळा प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती़ सीईओ संजय यादव यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तात्काळ कारवाईचे निर्देश दिले़ याबाबत शिक्षण समितीचे सभापती उकेश चौहाण यांनी कारवाईचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी व चौकशी अधिकाऱ्यांना दिले होते़ अखेर सीईओ अंकुश केदार यांनी २८ नोव्हेंबरला त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले़ त्यांना आदेशानंतर तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली.