नागपुरात प्लास्टिक व्यावसायिकांचे बेमुदत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM2018-03-28T00:54:57+5:302018-03-28T00:55:10+5:30
राज्य सरकारने प्लास्टिकवर सरसकट बंदी आणल्याच्या विरोधात प्लास्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. सरकारकडे न्यायाची मागणी करीत व्यापारी मस्कासाथ बाजारात अनिश्चितकालीन आंदोलन करीत आहेत. सरकारने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगार पुन्हा वाढून व्यवसायात मंदी येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने प्लास्टिकवर सरसकट बंदी आणल्याच्या विरोधात प्लास्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. सरकारकडे न्यायाची मागणी करीत व्यापारी मस्कासाथ बाजारात अनिश्चितकालीन आंदोलन करीत आहेत. सरकारने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगार पुन्हा वाढून व्यवसायात मंदी येणार आहे.
विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव हरीश मंत्री, मनीष जैन, जयेश शेषपाल, निशांत बिर्ला, पिंटू कोठारी, निखिल आमिडवार यांनी सांगितले की, बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, या मागणीसाठी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या निर्णयामुळे बेरोजगारात आणखी भर पडणार आहे. शेकडो व्यापारी धरणे-आंदोलन करीत आहेत. एका निर्णयाने सरकारने संपूर्ण उद्योगाला मंदीच्या खाईत लोटले आहे. प्रति व्यक्ती ४० ते ५० किलो प्लास्टिकचा उपयोग होणाºया विकसित देशांमध्ये सरकारने अजूनही बंदी आणलेली नाही. त्यातुलनेत भारतात अजूनही प्रति व्यक्ती २ ते ३ किलो प्लास्टिकचा उपयोग होतो. सरकारने लोकांना जागरूक करण्यासह रि-सायकलिंग व्यवस्था मजबूत करावी. वापरलेले प्लास्टिक रि-सायकलिंगद्वारे पुन्हा बाजारात आणल्यास पर्यावरणावर परिणाम पडणार नाही, शिवाय उद्योगला संजीवनी मिळेल.