घरकुल लाभार्थ्यांसाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:07+5:302021-07-20T04:08:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : केंद्र सरकारने वेळीच निधी उपलब्ध करून न दिल्याने घरकुल याेजनेच्या लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : केंद्र सरकारने वेळीच निधी उपलब्ध करून न दिल्याने घरकुल याेजनेच्या लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे. हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वडाेदा (ता. कामठी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात साेमवार (दि. १९) पासून बेमुदत उपाेषणाला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकार ‘एनएमआरडीए’ (नागपूर मेट्राेपाॅलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथाॅरिटी) अंतर्गत घरकुल याेजना राबिवत आहे. या याेजनेंतर्गत गरजूंना घरकुल मंजूर करण्यात आले; मात्र सरकारकडून घरकुल बांधकामासाठी वारंवार मागणी करूनही निधी उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले असून, काहींना इच्छा असूनही बांधकाम सुरू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांसह माेडकळीस आलेल्या घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
या लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहारच्या छत्रपाल करडभाजने, श्रीकांत ठाकरे, सोनू कानफाडे या पदाधिकाऱ्यांनी साेमवारपासून उपाेषणाला सुरुवात केली आहे. या आंदाेलनात पंकज ढोरे, कार्तिक भिसेकर, नान्हा मांगलीचे माजी सरपंच सुधाकर करडभाजने, वृषभ अटारकर, शुभम धावळे, रमेश पारधी, किरण महाकाळकर, गणेश करडभाजने, दिलीप चौधरी या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले आहेत.