कळमेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:59+5:302021-08-18T04:11:59+5:30
कळमेश्वर : शहर व तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाजार चौक येथे नगराध्यक्ष स्मृती इखार यांच्या हस्ते ध्वजारोहण ...
कळमेश्वर : शहर व तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाजार चौक येथे नगराध्यक्ष स्मृती इखार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न. प. उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, मुख्याधिकारी स्मिता काळे, नगरसेवक सत्यवान मेश्राम, अश्विनी धोंगडे, स्वर्ण मानकर, वनिता भलावी, महादेव ईखार, धनराज देवके, मनोज शेडे, नामदेव वैद्य, डॉ. राजीव पाेतदार, अरविंद रामावत उपस्थित होते. नगर परिषद ब्राह्मणी उपकार्यालय येथे उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे यांनी ध्वजारोहण केले. नगर काँग्रेस कमिटी कार्यालय येथे किशोर मंडलिक यांनी ध्वजाराेहण केले. भाजप कार्यालयात प्रभाकर श्रीखंडे यांनी ध्वजारोहण केले. तहसील कार्यालय येथे तहसीलदार सचिन यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत गड्डम, संजय भुजाडे, योगिता दराडे, सुजाता गावंडे व नागरिक उपस्थित हाेते. पंचायत समिती प्रांगणात उपसभापती जयश्री वाळके यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी पं. स. सदस्य विजय भांगे, श्रावण भिंगारे, गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये, विस्तार अधिकारी यशवंत लिखार, नंदू राऊत, कृषी अधिकारी प्रदीप टिंगरे, दीपक जंगले, डाॅ. हेमंत माळोदे, नंदकिशोर खंडाळ, सुशील राहाटे, यादव आदी उपस्थित होते. संचालन राहुल वानखेडे यांनी केले. तालुका खरेदी-विक्री संघ येथे अध्यक्ष बाबाराव कोढे यांनी ध्वजाराेहण केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती बाबाराव पाटील यांचे हस्ते, ग्रामपंचायत खैरी (लखमा) येथे सरपंच सचिन निंबाळकर, ग्रामपंचायत वरोडा येथे सरपंच दिलीप डाखोळे, ग्रामपंचायत लिंगा येथे सरपंच पल्लवी हत्ती, ग्रामपंचायत खापरी येथे सरपंच सोनू आवारी, ग्रामपंचायत लोहगड येथे सरपंच नरेंद्र डहाट, ग्रामपंचायत गोंडखैरी येथे सरपंच चांगदेव कुबडे, ग्रामपंचायत सेलू येथे सरपंच कुंती आसोले, ग्रामपंचायत कळंबी येथे सरपंच रश्मी मोहोड, ग्रामपंचायत घोराड येथे सरपंच मंगेश गोतमारे, ग्रामपंचायत उपरवाही येथे सरपंच चंद्रप्रकाश साठवणे, ग्रामपंचायत आष्टीकला येथे सरपंच प्रमोद नेगे, ग्रामपंचायत सावंगी येथे सरपंच नीता तभाने, ग्रामपंचायत धापेवाडा येथे सरपंच सुरेश डोंगरे, ग्रामपंचायत व उच्च प्राथमिक शाळा लोणारा येथे सरपंच सरला दुपारे यांनी ध्वजाराेहण केले.
.....
नगर परिषद माेहपा
मोहपा : नगर परिषद कार्यालय आणि न. प. उच्च प्राथमिक शाळा येथे नगराध्यक्ष शोभा कऊटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात संचालक तेजराज नाखले यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मारोती कोल्हे, वामन देवते, यादव ढोरे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. न्यू इंग्लिश हायस्कूल येथे भाऊराव अंजनकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश आदमने व कर्मचारी उपस्थित होते. कुसुमताई वानखेडे कन्या विद्यालयात तेजराज नाखले यांच्या हस्ते, मोहपा पोलीस चौकी येथे लक्ष्मण रुडे, मधुगंगा नागरी पतसंस्थेत ज्येष्ठ नागरिक दौलत गणोरकर, नेताजी ग्राहक संस्थेत संचालक मिलिंद यावलकर, सेवा सहकारी सोसायटीत उपाध्यक्ष समद पटेल, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात संचालक वैशाली ढगे, कय्युम पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका शिरीन शेख, प्रतिभा माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका नीलिमा नागपुरे यांनी ध्वजाराेहण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नजीकच्या खुमारी, मांडवी, पिपळा (किनखेडे), कनियाडोल, म्हसेपठार, सवंद्री, मोहगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.