स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:21+5:302021-08-17T04:12:21+5:30
नागपूर : स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
नागपूर : स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ७४ व्या वर्धापन दिनाला जिल्हाधिकारी विमला आर. यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर, व्ही. एम. देशपांडे, स्वप्ना जोशी, रोहित देव, मनीष पितळे, एस. एम. मोडक, अविनाश घरोटे, विनय जोशी, एन. बी. सूर्यवंशी, अनिल किलोर, पुष्पा गणेडीवाला, अमित बोरकर, जी. ए. सानप, रजिस्ट्रार प्रशासन संजय भारुका तसेच अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा न्यायालय, नागपूर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. जिल्हा न्यायाधीश - १ एम. एस. आजमी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, सचिव निखील देशमुख, जिल्हा प्रबंधक कविता गोडे तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
समाजकल्याण विभाग
स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
समाजकल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, वित्त व लेखा सहायक संचालक रमेश कुमरे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक खोब्रागडे, लेखाधिकारी डॉ. अर्चना सोलंकी, रमेश सहारकर तसेच अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.