नरखेड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:44+5:302021-08-17T04:13:44+5:30
नरखेड : येथील पंढरीनाथ कला-वाणिज्य महाविद्यालयात काेविड नियमांचे पालन करीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या ...
नरखेड : येथील पंढरीनाथ कला-वाणिज्य महाविद्यालयात काेविड नियमांचे पालन करीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. जयंत जवंजाळ, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य लीलाधर महाजन, एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ. समीर पाहुणे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स उपस्थित हाेते.
....
काटाेल येथे ठिकठिकाणी ध्वजाराेहण
काटोल : शहर व तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. काटोल नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष सुभाष कोठे, गटनेता चरणसिंग ठाकूर, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, शिक्षण सभापती देविदास कठाणे, संदीप वंजारी, किशोर गाढवे, तानाजी थोटे, हेमराज रेवतकर, शालिनी बनसोड, शालिनी महाजन, नम्रता जयस्वाल व इतर नगरसेवक, कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच कोरोना याेद्धांचा सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार नीलेश कदम, जंगले, विजय नेऊलकर व कर्मचारी उपस्थित होते. नबीरा महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष निरंजन राऊत, सदस्य प्रकाश चांडक, पुरुषोत्तम मानकर, योगेश पांडे, राजू बिसानी, प्राचार्य एस. के. नवीन, मोटवानी, प्राचार्या गांधी उपस्थित होते. पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे, अश्विनी वानखडे, प्रशांत लभाने, पोलीस उपनिरीक्षक आकाश शाही, संतोष निंभोरकर, श्रीकांत लांजेवार व कर्मचारी उपस्थित होते. बाजार समिती येथे सभापती तारकेश्वर शेळके यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसभापती सुनील खळतकर, संचालक अजय लाडसे, सचिव पराग दाते व कर्मचारी उपस्थित होते.