नरखेड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:06+5:302021-08-18T04:12:06+5:30
नरखेड : नगर परिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. गांधी चाैक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष ...
नरखेड : नगर परिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. गांधी चाैक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल कोरडे, जयस्तंभ चौक येथे न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे, भाजपा कार्यालयात शहराध्यक्ष संजय कामडे, जवाहर वाचनालय येथे नगरसेवक सुनील बालपांडे, तहसील कार्यालय येथे तहसीलदार डी. जी. जाधव, पंचायत समिती येथे सभापती नीलिमा रेवतकर, नरखेड न्यायालय येथे न्यायाधीश एन. बी. राठोड, तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी डॉ. योगिराज जुमडे, पाेलीस स्टेशन येथे ठाणेदार जयपालसिंह गिरासे, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बबनराव लोहे, मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालयात डॉ. चंद्रशेखर मोहोड, ग्राम सहकारी ग्राहक संस्थेत धर्मेंद्र पटेल, त्रिकोणी पार्क येथे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, क्रांतिज्याेती विद्यालय येथे सुरेश बांद्रे, स्व. गंगाधर कोरडे आयटीआय येथे मनोज कोरडे, शेतकी खरेदी विक्री संस्थेत अविनाश अनावणे, शासकीय आयटीआय येथे जितेंद्र घ्यार, जनसेवा संस्था एमआयडीसी येथे सुरेश शेंद्रे तसेच नगर परिषद शाळा क्र. १, २, ३, ४, ५, ६ येथे सभापती सुरेश रेवतकर, पुष्पा डफरे, सदस्य सुधाकर ढोके, मुशीर शेख, प्रगती कडू, वंदना बेहरे यांनी ध्वजारोहण केले.
.....
ग्रामपंचायत डेगमा (खुर्द)
हिंगणा : तालुक्यातील गट ग्रामपंचायत डेगमा (खुर्द) येथे सरपंच रूपाली प्रवीण खाडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. काेविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने अभ्यास पूर्ण करावा, पालकांनी मदत करावी. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानास न विसरता देशाचा विकास करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे विचार मान्यवरांनी मांडले. यावेळी तंबाखूमुक्तीबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संघपाल शंभरकर, रवींद्र रंगारी, संभाजी गुंडे, साेनाली साेनवाणे, पायल निंबाळकर यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित हाेते.
....
तहसील कार्यालय सावनेर
सावनेर : तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस, होमगार्ड पथकाने मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपविभागीय पाेलीस अधिकारी अशोक सरंबळकर, तहसीलदार सतीश मासाळ, पोलीस निरीक्षक हनुमंत मुळुक, नायब तहसीलदार चैताली दराडे, नितीन दापके, गजानन जवादे, मंडळ अधिकारी सुधाकर राठोड यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष रेखा मोवाडे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी न. प. उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी, मुख्याधिकारी हर्षला राणे, नगरसेवक तुषार उमाटे, आशिष मानकर, सचिन उईके, वनिता घुगल, लक्ष्मी बागडे, स्वाती कामडी, स्मिता घटे, इंदिरा झोडापे, प्राजक्ता वानखेडे, सुषमा दिवटे, तेजस्विनी लाड, प्रभा कमाले, नलिनी नारेकर, दीपक बसवार, अविनाश झाडे, सुनील चापेकर, अरविंद ताजने, शफीक सय्यद, ॲड. युवराज बागडे, रवींद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी दिनेश बुधे उपस्थित होते.
....
ग्रामपंचायत सातगाव
बुटीबोरी : सातगाव ग्रामपंचायत येथे सरपंच योगेश सातपुते यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य नीता वलके, सचिव सुधाकर बुलकुंडे, उपसरपंच प्रवीणा शेळके, विलास भोमले, सुधाकर धामंदे, राजू हाते तसेच आशावर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय कर्मचारी, जि. प. शिक्षक, माजी सैनिक नरेश गोडघाटे, तुळशीराम झाडे, सतीश शेळके आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
....
नगर परिषद खापा
खापा : स्थानिक नगर परिषद येथे नगराध्यक्ष प्रियंका माेहटे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी न. प. उपाध्यक्ष देवाजी बाेरकर, मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे तसेच सभापती व नगरसेवक उपस्थित हाेते. पाेलीस स्टेशन येथे ठाणेदार अजय मानकर यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, विजय बारई, संजय वानखडे, दीपक मानवटकर, यादव हाेमराज, अशाेक ठाकूर, भारती चामट, अनिता तायडे, शुभांगी पुसदकर व कर्मचारी उपस्थित हाेते. पाटबंधारे विभाग खापा येथे कनिष्ठ अभियंता पी. जे. बैस यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी तुळशी नंदन, प्रवीण फटिंग, पी. एस. कुकडे, योगेश कुडुपले, सुनील मैंद, वेदांती वंजारी, शुभांगी घागरे, नाजमी शेख, दिलीप डाखोडे व कर्मचारी हजर होते. नंदापूर जि. प. शाळेत शिक्षण सभापती आनंद परतेकी यांनी ध्वजाराेहण केले. कार्यक्रमाला सविता राऊत, माधुरी झरकर, साहेबराव धोटे, अशोक मुरकुटे, कल्पना चटप, ग्रा.पं. सदस्य चंद्रकला मुरकुटे, तुळशीदास पाटील, प्रफुल मुरकुटे, शोभा तांदूळकर, धोंडोबा मोजनकर व शिक्षक उपस्थित होते.
.......
पुनर्जन्म आश्रम, बुटीबाेरी
बुटीबोरी : परिसरातील साथ फाऊंडेशनच्या वतीने पुनर्जन्म आश्रम येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. रामसिंग ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी साफसफाई कर्मचारी व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव बडनेरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक खेडुलकर गुरुजी, सवाने गुरुजी, शेख गुरुजी, शामराव गावंडे, पालीवाल, डॉ. देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमास राशिका तिरपुडे, कल्याणी भगत, सुवर्णा उमाटे, उमा पांडे, ऋषी पाटील, प्रतीक तरणकंठीवार, परितोष रेंगे, अक्षय बहादुरे, अमित वैद्य, सौरभ शेंडे, आशिष खंते, परीक्षित रेंगे, चेतन येळणे, विकास डोंगरे आदींनी सहकार्य केले.