'उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे तेव्हा जेलमध्ये असतील...'; फडणवीसांचं नाव घेत रवी राणांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:12 PM2022-12-27T15:12:26+5:302022-12-27T16:20:14+5:30

अपक्ष आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Independent MLA Ravi Rana has criticized former CM Uddhav Thackeray and former minister Aditya Thackeray. | 'उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे तेव्हा जेलमध्ये असतील...'; फडणवीसांचं नाव घेत रवी राणांचा इशारा

'उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे तेव्हा जेलमध्ये असतील...'; फडणवीसांचं नाव घेत रवी राणांचा इशारा

Next

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नागपुरात आरोपांचे बॉम्ब फोडू असा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. दुपारी बाराच्या सुमारास राऊतांनी अगरबत्ती जोडलेला सुतळी बॉम्बचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यामुळे ठाकरे-राऊत सत्ताधाऱ्यांविरोधात कोणता बॉम्ब फोडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिवसभर कोणताच बॉम्ब फोडला नाही. त्यामुळे विरोधकांकडून त्यांना टोला लगावण्यात येत आहे. 

अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनेक फाईल पेंडींग आहेत काहींचा तपास सुरू आहे. त्यांचे ४० आमदार सोडून गेले हा बॉम्ब आधीच फुटला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. 

संजय राऊतांनी नागपुरात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये गेल्या अडीच वर्ष उध्दव ठाकरे यांनी कुठले पाच काम केले हे संजय राऊत यांनी सांगितलं तर मी त्यांना बक्षीस देईल, असं आव्हान देखील रवी राणा यांनी यावेळी दिलं. महाविकास आघडतील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर बाहेर आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला लोकांना अशी भाषा शोभत नसल्याचं देखील रवी राणा यांनी सांगितलं.  

दरम्यान, मच्याकडे बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. आता पेटवण्याची गरज आहे. परंतु सीमाभागात लाखो मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्यावर ठराव मांडणं गरजेचे आहे. तुम्ही आमच्यात असताना लाठ्या काठ्या खाल्ल्या म्हणून तुम्ही आता गप्प बसा असं होत नाही. केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत या मुद्द्यावर उत्तर नाही. हे अनैतिक सरकार असल्याने त्यांच्याकडून नैतिकता अपेक्षित नाही अशा शब्दात आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

Web Title: Independent MLA Ravi Rana has criticized former CM Uddhav Thackeray and former minister Aditya Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.