राखीपासून दिवाळीपर्यंत सण ठरणार भारतीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:09 PM2020-07-08T21:09:50+5:302020-07-08T21:12:21+5:30

ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासून दिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.

Indian festival from Rakhi to Diwali! | राखीपासून दिवाळीपर्यंत सण ठरणार भारतीय!

राखीपासून दिवाळीपर्यंत सण ठरणार भारतीय!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासूनदिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.
गेल्यावर्षी तीन महिन्यांच्या या सणांमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या वस्तू देशात आयात झाल्या होत्या. व्यापाऱ्यांच्या संकल्पामुळे आता हा व्यवसाय भारतीयांना मिळणार आहे.
देशातील रिटेल व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) सध्या देशात चिनी वस्तूंच्या बहिष्काराची राष्ट्रीय मोहीम राबवीत आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या राखी सणापासून ते २५ नोव्हेंबरला होणाऱ्या तुळशी विवाहापर्यंतच्या सर्व सणांमध्ये लागणाऱ्या वस्तू भारतीय बनावटीच्या असाव्यात, असे आवाहन सर्व व्यापारी संघटनांना केले आहे. सणांच्या तीन महिन्यात राखी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, तुळशी विवाह आदी सण येणार आहेत. प्रत्येक सणात भारतीय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी कॅटने एक व्यापक योजना तयार केली असून, सर्व वस्तूंची यादी तयार करीत आहे. ती ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, सणांशी संबंधित भारतीय वस्तू तयार करणारे निर्माता, कारागीर, लघु उद्योग, कुंभार, महिला उद्योजिका, स्वयंउद्योजक, स्टार्टअप आदींशी संपर्क साधून त्यांना किती प्रमाणात वस्तू तयार करायच्या आहेत, याची माहिती गोळा करण्याचा सल्ला कॅटची राज्यस्तरीय चमू आणि अन्य प्रमुख व्यापारी संघटनांना दिला आहे. दुसरीकडे त्यांच्या राज्यात उपरोक्त वस्तूंची किती विक्री आहे, याचीही माहिती एकत्र करण्यास म्हटले आहे. ही माहिती १५ जुलैपर्यंत तयार होणार आहे.
एकत्रित केलेला डेटा कॅटच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात गोळा होईल आणि दोन्ही डेटाच्या आधारावर कोणत्या राज्यात किती वस्तू तयार होत आहेत आणि त्यांची राज्यात किती विक्री आहे, हे वगळता उर्वरित वस्तू कोणत्या राज्यात पाठविल्या पाहिजेत, याची विस्तृत माहिती गोळा होईल. त्यामुळे देशात मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ साधला जाईल, तसेच देशात भारतीय वस्तूचा तुटवडा जाणवणार नाही. या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील वाहतूकदारांची आघाडीची संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन किफायत दरात करणार आहे.
भरतीया म्हणाले, भारतीय सणांच्या मोहिमेत कॅटच्या संबंधित राज्यातील महिला चमूची विशेष भूमिका राहणार असून, उद्योजिका आणि महिला गृह उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. राखी व राखी धागा, मिठाई, नमकीन महिला तयार करतील आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था कॅट करणार आहे. सणांमध्ये लहान-मोठ्या उद्योगातून २० हजार कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Indian festival from Rakhi to Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.