भारतीय कंपनी सचिव संस्थानामुळे नागपूरच्या शैक्षणिक समृद्धीत भर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:52+5:302021-09-05T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय कंपनी सचिव संस्थान ही राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमार्फत कंपनी ...

The Indian Institute of Company Secretaries adds to the educational prosperity of Nagpur. | भारतीय कंपनी सचिव संस्थानामुळे नागपूरच्या शैक्षणिक समृद्धीत भर ()

भारतीय कंपनी सचिव संस्थानामुळे नागपूरच्या शैक्षणिक समृद्धीत भर ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय कंपनी सचिव संस्थान ही राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमार्फत कंपनी सचिव अभ्यासक्रमाचा लाभ येथील विद्यार्थ्यांना मिळत असून शहराच्या समृद्धीतही भर पडली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितीन राऊत यांनी येथे केले. वर्धा रोडवरील हॉटेल ली मेरिडीयन येथे शनिवारी भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती विजय डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय कंपनी सचिव संस्थानाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेंद्र राव, राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, विभागीय अध्यक्ष पवन चांडक, नागपूर विभागाच्या अध्यक्षा खुशबू पसारी, सचिव रेश्मा मिटकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

राऊत म्हणाले, कोणताही उद्योग व्यवसाय विकसित करतांना कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. भारतीय कंपनी सचिव संस्थानाचा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शहरात उपलब्ध झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होणार आहे. या शिक्षण संस्थेत देशभरातील तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून ५५ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. तर नागपूर शहरात दोन हजार विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असून ३५० नोंदणीकृत सदस्य आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी अशा शिक्षण संस्थांचे महत्त्व वादातीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी न्यायमूर्ती डागा म्हणाले, उद्योग अधिक विकसित होण्यासाठी कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. उद्योग उभारणी आणि ते चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. यासाठी कंपनी सचिवाचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे.

प्रारंभी भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे पालकमंत्र्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तुषार पहाडे, दीप्ती जोशी, रोहन मेहरा, शांतनू जोग आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय कंपनी सचिव या संस्थेच्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रियांका श्रीवास्तव यांनी केले. तर सचिव रेश्मा मिटकरी यांनी आभार मानले.

Web Title: The Indian Institute of Company Secretaries adds to the educational prosperity of Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.