भारतीय संगीताच्या उपेक्षेची खंत वाटते

By admin | Published: January 11, 2015 12:48 AM2015-01-11T00:48:53+5:302015-01-11T00:48:53+5:30

भारतीय संगीताकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय संगीत, साहित्य आणि कलांकडे विदेशातील लोकांचा ओढा विलक्षण असलेला मी अनुभवतो आहे. त्याउलट भारतात मात्र

Indian music seems to be concerned with the deciphering | भारतीय संगीताच्या उपेक्षेची खंत वाटते

भारतीय संगीताच्या उपेक्षेची खंत वाटते

Next

पं. स्वपन चौधरी : विदेशातील नव्या पिढीत भारतीय संगीताचे गांभीर्य
नागपूर : भारतीय संगीताकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय संगीत, साहित्य आणि कलांकडे विदेशातील लोकांचा ओढा विलक्षण असलेला मी अनुभवतो आहे. त्याउलट भारतात मात्र आपल्याच संगीताची उपेक्षा होत आहे. नवी पिढी पाश्चात्त्य संगीतात रममाण होते आहे. याच्याकडे ना सरकारचे लक्ष आहे ना येथील कलारसिकांचे. आपल्याच देशात आपल्या संगीताची उपेक्षा होते, याची खंत व्यक्त करीत पं. स्वपन चौधरी यांनी भारतीय संगीतासारखे दुसरे संगीत नाही, असे म्हटले.
गेली ३४ वर्षे आपण कॅलिफोर्निया आर्ट आॅफ तबला अँड परफार्मिंग आर्ट रिसर्च युनिर्व्हसीटीत शिकवित आहोत. गेल्या काही वर्षापूर्वी भारतीय संगीताविषयी इतके वेड मी अनुभवले नाही पण सध्याची पिढी मात्र भारतीय संगीत शिकण्यासाठी तेथे अतिशय गंभीर आहे. भारतात मात्र आपले संगीत शिकण्यापेक्षा प्रत्येकालाच अभियंता आणि डॉक्टर व्हायचे आहे. या देशाला संगीतकारांचीही गरज आहे. कॅलिफोर्नियात दोन गटात तज्ज्ञ समितीने एक अभ्यास नोंदविला. संगीत शिकणारा आणि न शिकणारा मुलांचा गट. यात वर्षाअखेर संगीत शिकणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक ८० पेक्षा जास्त तर न शिकणाऱ्या मुलांचा ५० पेक्षा कमी आढळला. त्यानंतर प्रत्येक शाळेत संगीत अनिवार्य करण्यात आले.
आपल्याकडे मात्र संगीत हा विषय दुय्यम समजला जातो. प्रत्यक्षात संगीताच्या भरवशावरच फार मोठ्या संख्येत लोकांचे पोट भरते आहे आणि त्यांना प्रतिष्ठाही मिळते आहे. यासाठी शासनाने किमान तीन संगीत वाहिन्या सुरू कराव्यात. आवड असलेल्या मुलांना संगीतात भविष्य घडवू द्यावे आणि पालकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Indian music seems to be concerned with the deciphering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.