इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकाने लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप; कोट्यवधींची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 10:27 AM2022-03-27T10:27:57+5:302022-03-27T10:37:42+5:30

indian oil officials bribery case : बिलांची मंजुरी असो की आणखी काही, रोडगे अर्थपूर्तीशिवाय ती फाईलच मोकळी करीत नव्हते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एकेका प्रकरणात चक्क दहा लाखांपर्यंतची डिमांड केली जायची. त्यामुळे अनेकजण वैतागले होते.

Indian Oil general manager hides corruption in locker | इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकाने लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप; कोट्यवधींची मालमत्ता

इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकाने लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप; कोट्यवधींची मालमत्ता

Next
ठळक मुद्देएक, दोन नव्हे तीन-तीन लॉकरसीबीआयकडून भ्रष्टाचाराचे खोदकाम सुरू

नरेश डोंगरे

नागपूर : पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लबालब झालेले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल) महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यांनी आपले पाप बँकांमधील लॉकरमध्ये लपवून ठेवले आहे. साथीदाराला पकडताच ते फरार झाले असले तरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवास आणि कार्यालयाची झडती घेऊन एक, दोन नव्हे तर चक्क तीन ‘लॉकर की’ मिळवल्या आहेत. याशिवायही बरीचशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे रोडगेच्या काळ्या कमाईची माया सोमवारी उजेडात येणार आहे.

आयओसीएलचे महाव्यवस्थापक म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि शिर्षस्थ पद. कंपनीतून पेट्रोल पंप वितरण व्यवस्थाच नव्हे तर प्रचार-प्रसाराशी संबंधित परवाने, बिल मंजुरीचे अमर्याद अधिकार असते. महिन्याला कोट्यवधींचा व्यवहार (हिशेब) होतो. तीन ते साडेतीन वर्षांपासून येथे एन. पी. रोडगे कार्यरत होते. री कान्स्ट्री (नामांतर) असो की दुसरी कोणतीही परवानगी असो, बिलांची मंजुरी असो की आणखी काही, रोडगे अर्थपूर्तीशिवाय ती फाईलच मोकळी करीत नव्हते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एकेका प्रकरणात चक्क दहा लाखांपर्यंतची डिमांड केली जायची. त्यामुळे अनेकजण वैतागले होते.

मुंबई, दिल्ली कनेक्शनचा धाक

सूत्रांच्या माहितीनुसार, रोडगेची तक्रार केल्यास ते आपले मुंबई-दिल्लीचे समांतर कनेक्शन वापरून तक्रारीची वाट लावायचे. याच कनेक्शनची आठवण करून देत ते आपली बदलीही होणार नाही, याची काळजी घेत होते. त्यांचे एक नातेवाईक सचिवालयात सेवारत होते, ती ओळख ते अनेक वर्षांपासून स्वत:च्या सुरक्षेसाठी वापरत असल्याचे सांगितले जाते.

२० मार्चला झाले प्रमोशन

सूत्रांच्या माहितीनुसार, रोडगेचे २० मार्चलाच प्रमोशन झाले. ३१ मार्चला ते येथून जाणार होते. त्यासाठी त्यांनी ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचा सपाटा लावला होता. या सपाट्यामुळेच ते पकडले गेल्याची चर्चा आहे. रोडगेच्या त्रासाला कंटाळलेल्यांपैकी काहीजण सीबीआयकडे धाव घेणार असल्याचीही चर्चा आहे.

शिवाजीनगर, मनीषनगरचे कनेक्शनही चर्चेत

रोडगेकडे आढळलेल्या वेगवेगळ्या बँका लॉकरच्या चाव्या सीबीआयच्या हातात आहे. मात्र, शनिवार, रविवार बँक बंद असल्याने त्यात काय घबाड आहे, ते सोमवारीच उजेडात येईल. मात्र, आधीच बोभाटा झालेल्या शिवाजीनगर, मनीषनगरातील स्थावर संपत्तीवरही लवकरच प्रकाश पडणार आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराचे खोदकाम जोरात सुरू केले असल्याने अनेक धक्कादायक खुलासे अपेक्षित आहेत.

Web Title: Indian Oil general manager hides corruption in locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.