आरपीएफचे सतीश इंगळेंना भारतीय पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:15 PM2020-01-25T23:15:45+5:302020-01-25T23:17:16+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सतीश इंगळे यांची कार्यकुशलता, इमानदारी आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सतीश इंगळे यांची कार्यकुशलता, इमानदारी आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे. इंगळे हे कामठी येथे कार्यरत आहेत. त्यांनी रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांविरुद्ध ऑपरेशन थंडर १ आणि २ मध्ये योगदान दिले. १४ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ३७ हजार ३१७ रुपयांच्या ६२ लाईव्ह तिकीट जप्त केल्या. तसेच १२ लाख ४४ हजार ६२० रुपयांच्या जुन्या तिकीट जप्त केल्या. त्यांनी २०१४ मध्ये पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त केला. रेल्वे संपत्तीचे नुकसान करणाऱ्या ५ प्रकरणात ९ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख २५ हजार ९७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे.