इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:24 PM2018-11-21T22:24:26+5:302018-11-21T23:09:57+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाच तयारी पूर्ण झाली असून २२ नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा होत असून देश-विदेशातून तीन हजार तज्ज्ञ हजेरी लावणार आहेत. आयोजन समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि सचिव व पंतप्रधान ग्राम सडक येजनेचे अधीक्षक अभियंता रमेश होतवानी यांनी याबाबत बुधवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते) सी.पी. जोशी आणि आयआरसीचे सचिव निर्मलकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

The Indian Road Congress convention will be held in Nagpur from Thursday | इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात

इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय क्रीडा संकुल स्वागतासाठी सज्जदेशभरातून येणार तीन हजार तज्ज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाच तयारी पूर्ण झाली असून २२ नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा होत असून देश-विदेशातून तीन हजार तज्ज्ञ हजेरी लावणार आहेत.  


आयोजन समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि सचिव व पंतप्रधान ग्राम सडक येजनेचे अधीक्षक अभियंता रमेश होतवानी यांनी याबाबत बुधवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते) सी.पी. जोशी आणि आयआरसीचे सचिव निर्मलकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. 

२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाच्या तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण चार तांत्रिक सत्रे होतील. या सत्रांमध्ये विद्यार्थी, वैज्ञानिक, बांधकाम व्यावसायिक आपले तांत्रिक शोधपत्र (टेक्निकल पेपर) सादर करतील.
२३ नोव्हेंबरला अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री(एमएसआरडीसी) एकनाथराव शिंदे, राज्यमंत्री प्रवीण पोटे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 

याप्रसंगी मुख्य अतिथींच्य हस्ते स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. २४ नोव्हेंबरला आयआरसी जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या विविध शोधपत्रांचे सादरीकरण अधिवेशनात सहभागी झालेले तज्ञ करतील. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण सात तांत्रिक सत्रे या दिवशी आयोजित करण्यात आली आहेत. २५ नोव्हेंबरला २१७ वी कौन्सिल बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर अधिवेशनाचा औपचारिक समारोप करण्यात येईल. याशिवाय सर्वसामान्य जनतेला तांत्रिक प्रदर्शन बघण्यासाठी खुले राहणार आहे.

देशभरातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी चर्चा
या अधिवेशनासाठी देशातील सर्वच राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले असून, बहुतांश मंत्री सहभागी होणार आहेत. २३ तारखेला दुपारी १२ वाजता विविध राज्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चर्चा करतील. त्यानंतर गडकरी विदेशी शिष्टमंडळाशी संवाद साधतील.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
या अधिवेशनासाठी देशभरातील प्रतिनिधी कुटुंबासह सहभागी होणार आहेत. दिवसभराच्या तांत्रिक चर्चासत्रानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. पहिल्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ८ वाजता प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अशोक हांडे व चमूचा गीतांचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या
दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा कार्यक्रम होईल आणि शनिवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्यासह प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव मनोरंजन करतील.

वर्षभरापासून तयारी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांनी यावेळी सांगितले की, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आायआरसीचे भव्यदिव्य प्रदर्शन नागपुरात आयोजित करण्याचे निर्देश वर्षभरापूर्वी दिले होते. त्यानुसार वर्षभरापासून याची तयारी सुरू होती.

Web Title: The Indian Road Congress convention will be held in Nagpur from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.