वुडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; सुदीप मानवटकर, पूजा चौधरी कर्णधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:24 PM2023-07-25T17:24:41+5:302023-07-25T17:25:09+5:30
वुडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून सुदीप मानवटकरकडे पुरूष तर पूजा चौधरीकडे महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
नागपूर : मलेशियातील पहांग शहरात २६ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत आयोजित तिसऱ्या बीच विश्वचषक तसेच २३ व्या मलेशिया ओपन वुडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेत पुरुष संघाचे नेतृत्व स्थानिक आंतरराष्ट्रीय खेळाडू सुदीप प्रवीण मानवटकर, तर महिला संघाचे नेतृत्व छत्तीसगडची पूजा चौधरी करणार आहे.
भारतीय संघाचे चार दिवसीय सराव आणि तयारी शिबिर नागपुरात पार पडले. मंगळवारी संघ स्पर्धास्थळाकडे रवाना झाला. वुडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख, महासचिव अजय सोनटक्के, उपाध्यक्ष किशोर बागडे, कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर, डॉ. नीलेश भरणे, अनुपसिंग राठी, राजीव दलाल, डॉ. सूरज येवतीकर, अजयसिंग मीना, हेमंत भालेराव, डॉ. अपर्णा राऊत, देवांग शाह, हेमंत पायेर, सागर सावंत, तुषार पाटील यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय वुडबॉल संघ - पुरुष- सुदीप मानवटकर कर्णधार, हर्षल वानखेडे महाराष्ट्र, भरत कुमार गुजरात, दीपक कुमार अग्रवाल, जितेंद्र पटेल, श्रींगी शर्मा छत्तीसगड, दिनेश कुमार, गजेंद्रसिंग नरूका, रोशन गुर्जर, विक्रम पाल राजस्थान, रोहितसिंग हरियाणा, कपिल कुमार साहू उत्तराखंड, हार्दिक धूल.
महिला संघ - पूजा चौधरी कर्णधार, अनामिका शुक्ला, चैनकुमारी निशाद - सर्व छत्तीसगड, मयूरी गाडगे महाराष्ट्र, अर्पिता उपाध्याय उत्तराखंड, निकिता यादव हरयाणा.