नागपुरात स्वदेशीची मागणी, चिनी वस्तूंचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 08:25 PM2020-06-27T20:25:07+5:302020-06-27T20:26:33+5:30
‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले. यावेळी बॅनर आणि झेंडे दाखवून कोविड-१९ च्या फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून प्रदर्शन केले आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करीत आहे. चिनी वस्तू बाजारात कमी किमतीत विकून भारतीय अर्थव्यवस्थेला कमजोर करीत आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पूर्णपणे बहिष्कार करावा आणि भारतात निर्मित वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे देशात रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. व्यापाºयांकडे चिनी वस्तू असेल तर त्या विकून नवीन माल न बोलविण्याची प्रतिज्ञा घ्यावी.
या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, संजय के अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य संतोष काबरा, महेश कुकरेजा, शंकर सुगंध, मनोज लुटारिया, नारायण तोष्णीवाल, राहुल जैन, मनुभाई सोनी, नारायण घिंगडा, राकेश गांधी, अशोक शनिवारे, राजेश मुनियार, मनोहरलाल आहुजा, पवन जैन, अनिल जैन, विजय चांडक, राजकुमार गुप्ता, कॅट नागपूर अध्यक्ष किशोर धाराशिवकर, अभय कोठारी, राजेश गोयल, रितेश मोदी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.