इंडिगो सुरू करणार तीन नवीन विमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:56 PM2020-09-08T23:56:33+5:302020-09-08T23:57:39+5:30
इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे.
अहमदाबाद विमान १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे विमान अहमदाबाद येथून सायंकाळी ६ वाजता रवाना होऊन ७.४५ वाजता नागपुरात पोहोचेल. दुसरे विमान ७.२० वाजता निघून रात्री ८.५५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. या विमानाचे संचालन मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला होणार आहे. आता विमान सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारला या मार्गावर सुरूचआहे. यानुसार अहमदाबादकरिता विमान दररोज उपलब्ध होणार आहे. हैदराबादकरिता विमानसेवा १६ सप्टेंबरपासून सुरू होईल. हे विमान दुपारी २.५० वाजता हैदराबादेतून रवाना होऊन ४.३५ वाजता पोहोचेल. हे विमान येथून ५ वाजता उड्डाण भरून ७ वाजता हैदराबादला पोहोचेल. विमान सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारला राहील. सध्या हैदराबादकरिता मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमानसेवा सुरू आहे. दिल्लीकरिता नवीन विमानसेवा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल. दिल्लीहून विमान रात्री १०.१५ वाजता नागपुरात पोहोचून सकाळी ६.१५ वाजता दिल्लीला रवाना होईल.