इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:07 AM2019-05-27T10:07:02+5:302019-05-27T10:07:29+5:30

इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे.

IndiGo's Nagpur-Delhi new flight service | इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यात केवळ रविवारी उपलब्ध राहणार आहे. रविवारी अतिरिक्त विमानाच्या पहिल्या उड्डाणाने खासदार नितीन गडकरी दिल्लीहून नागपुरात पोहोचले.
नवीन विमान ६ई २०४३ दिल्ली-नागपूर रविवारी सकाळी दिल्लीहून १० वाजता रवाना होऊन सकाळी ११.२५ वाजता नागपुरात पोहोचले. त्यानंतरच रविवारीच विमान ६ई २०४४ सकाळी ११.५५ वाजता दिल्लीकडे रवाना झाले. एअरलाईन्सच्या सूत्रांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येसह लग्नसमारंभामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्ली मार्गावर अतिरिक्त विमान सेवेची मागणी होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नागरी उड्ड्यण संचालनालयाकडे (डीजीसीए) नवीन विमानाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला.

ऑगस्टपर्यंत राहील विमान सेवा
सध्या नव्याने सुरू झालेली विमान सेवा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला तरच आणखी काही दिवस ही सेवा सुरू राहील. नागपूर-दिल्ली-नागपूर अतिरिक्त उड्डाणासाठी एअरबस-३२० विमानाचा उपयोग करण्यात येत आहे. या विमानाची प्रवासी संख्या १८० एवढी आहे. इंडिगो एअरलाईन्सची आता या नवीन विमान सेवेसोबतच नागपूरहून दिल्लीकरिता एकूण पाच उड्डाणे झाली आहेत.

Web Title: IndiGo's Nagpur-Delhi new flight service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indigoइंडिगो