इंडिगोची नागपूर-भुवनेश्वर नवीन विमानसेवा १७ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 09:37 PM2020-08-14T21:37:36+5:302020-08-14T21:39:29+5:30
इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा फायदा प्रवाशांना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा फायदा प्रवाशांना होत आहे.
इंडिगोचे ६ई १५८ हे विमान सकाळी ११ वाजता नागपुरातून रवाना होईल आणि दुपारी १२.३५ वाजता भुवनेश्वरला पोहचेल तर भुवनेश्वरहून ६ई १५९ हे विमान दुपारी १.१५ वाजता रवाना होऊन नागपुरात २.५० वाजता येईल आणि ३.४५ वाजता रवाना होईल. या विमानाचा मार्ग नागपुरातून भुवनेश्वर आणि भुवनेश्वरहून अहमदाबाद तसेच अहमदाबाद-भुवनेश्वर आणि भुवनेश्वर-नागपूर असा राहणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस सुरू राहील.
याशिवाय इंडिगोची नागपूर-हैदराबाद उड्डाण २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हैदाराबादचे ६ई ७७४५ विमान हैदराबादहून सकाळी ६.२० वाजता उड्डाण भरून ८.०५ वाजता नागपुरात पोहचेल आणि नागपुरात ६ई ७७४६ विमान सकाळी ८.३५ वाजता रवाना होऊन १०.२० वाजता पोहचेल. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीन दिवस राहील.
तसेच इंडिगोची अहमदाबाद-नागपूर विमान सेवा २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ६ई १५८ विमान अहमदाबादहून सकाळी ८.३० वाजता उड्डाण घेऊन सकाळी १० वाजता नागपुरात आणि ६ई १५९ विमान नागपुरातून दुपारी ३.५० वाजता उड्डाण भरून सायंकाळी ५.२० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी चार दिवस राहील.
१५ ऑगस्टला नागपुरातून इंडिगोची सहा आणि एअर इंडियाचे एक असे सात विमाने उड्डाण भरणार आहेत. यामध्ये दोन विमाने मुंबई, तीन दिल्ली, एक पुणे आणि एक बेंगळुरु असे शेड्युल आहे.