मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण

By आनंद डेकाटे | Published: June 20, 2024 07:00 PM2024-06-20T19:00:29+5:302024-06-20T19:01:25+5:30

२९ जून पर्यंत अर्ज करता येणार.

indo german tool room skill development training for maratha kunbi boys and girls | मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण

मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी "इंडो जर्मन टूल रुम" कौशल्य विकास प्रशिक्षण

आनंद डेकाटे, लाेकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम २०२४-२५ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या १२५ जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत असलेल्या विविध प्रशिक्षणाकरिता येत्या २९ जूनपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. 

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक-युवतीसाठी पूर्णवेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १० वी, आयटीआय, डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, सिव्हील इंजिनिअर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा एकूण 851 जागा असून नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी १२५ जागा उपलब्ध आहेत. 

‘इंडो जर्मन टूल रुम’ कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Web Title: indo german tool room skill development training for maratha kunbi boys and girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.