नागपूर शहरातील उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:10 PM2020-04-20T12:10:24+5:302020-04-20T12:10:49+5:30

लॉकडाऊनदरम्यान २० एप्रिलपासून काही उद्योग, आस्थापना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने १७ एप्रिल रोजी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Industries and establishments in Nagpur city are obliged to follow the rules of social distance | नागपूर शहरातील उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

नागपूर शहरातील उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान २० एप्रिलपासून काही उद्योग, आस्थापना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने १७ एप्रिल रोजी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधितांकडून संपूर्ण अटी व शर्तींचे पालन होत असेल तरच मनपा आयुक्त त्यासंदर्भातील अनुषंगिक परवानगी देतील. यासंदर्भात अर्ज करताना संबंधित आस्थापनेची कार्यप्रणाली कशी असेल, किती कर्मचारी उपस्थित राहतील, त्यांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतर पाळले जात आहे की नाही, सॅनिटायझेशनची काय व्यवस्था असेल आदींचा स्पष्ट उल्लेख अर्जात असायला हवा. अनुज्ञेय उद्योग सुरू करताना तेथपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगीकरिता कर्मचाऱ्यांना ‘ट्रॅव्हल पास’ मनपा आयुक्तांकडून घ्यावी लागेल.

प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता नाही

नागपूर महानगरपालिकेतील जे क्षेत्र कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यामुळे मनपा आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, त्या क्षेत्रात मात्र सदर उद्योग, आस्थापनांना शिथिलता अनुज्ञेय राहणार नाही. अर्थात कोरोनाचे रुग्ण आढळलेले जे क्षेत्र मनपा आयुक्तांनी सील केलेले आहेत, त्या क्षेत्रातील वरीलपैकी कुठल्याही सदर कामांना परवानगी मिळणार नाही अथवा भविष्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले तर रुग्ण ज्या क्षेत्रातील असेल ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात येईल. तेथील कुठल्याही उद्योगांना, आस्थापनांना तात्काळ प्रभावाने लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय करण्यासंदर्भातील परवानगी रद्द करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना राहतील. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या एकूण १० झोनपैकी गांधी-महाल, सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी व धरमपेठ या झोनमधील संबंधित काही क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात सदर शिथिलतम उद्योग, व्यवसायांना परवानगी अनुज्ञेय असणार नाही.



अशी राहतील मार्गदर्शक तत्त्वे
उद्योग, आस्थापना व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्यासाठी परवानगी हवी आहे त्यासाठी पुढीलप्रकारे मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) राहतील.

संबंधित आस्थापनेच्या संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे

कर्मचाºयांसाठी कंपनीतर्फे सामाजिक अंतर पाळून प्रवास व्यवस्था करणे
थर्मल स्कॅनिंग करणे

लिफ्टचा कमीतकमी वापर करणे
गुटखा, तंबाखू आणि थुंकण्यावर निर्बंध

कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचे अंतर असावे


परवानगीसाठी मनपात विशेष कक्ष

संबंधित आदेशानुसार घ्यावयाच्या परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागेल. नागपूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येत आहे. संबंधितांनी सादर केलेल्या अर्जाची संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच योग्य वाटल्यास आणि नियमांची पूर्तता करणाºया अर्जांनाच परवानगी देण्यात येईल.


लॉकडाऊन सुरूच राहणार

काही अटी-शर्तींच्या आधारे परवानगी देण्यात येत असली तरी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायमच राहील. या सर्व सेवातील व्यक्ती, वाहन ज्यांना मनपा आयुक्तांतर्फे परवानगी आहे, अशांनाच फक्त संबंधित ठिकाणी जाता येईल. इतरांना घरातच राहायचे आहे. लॉकडाऊनदरम्यान पाळावयाचे नियम पाळायचेच आहेत. या काळात राज्य सरकारच्या सूचनांचे जे लोक उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: Industries and establishments in Nagpur city are obliged to follow the rules of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.