एमएसएमई कंपन्यांना आता उद्योग नोंदणी बंधनकारक सीए : जुल्फेश शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:16 AM2020-09-11T00:16:50+5:302020-09-12T00:17:32+5:30

एमएसएमई मंत्रालयाच्या उद्योग नोंदणी पोर्टलवर आता प्रत्येक एमएसएमई कंपनीला नोंदणीकरिता अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या उद्योग नोंदणी प्रमाणपत्राचा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार असल्याची माहिती सीए जुल्फेश शाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Industry registration now mandatory for MSMEs: Zulfesh Shah | एमएसएमई कंपन्यांना आता उद्योग नोंदणी बंधनकारक सीए : जुल्फेश शाह

एमएसएमई कंपन्यांना आता उद्योग नोंदणी बंधनकारक सीए : जुल्फेश शाह

Next
ठळक मुद्देसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमएसएमई मंत्रालयाच्या उद्योग नोंदणी पोर्टलवर आता प्रत्येक एमएसएमई कंपनीला नोंदणीकरिता अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या उद्योग नोंदणी प्रमाणपत्राचा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार असल्याची माहिती सीए जुल्फेश शाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.
शाह म्हणाले, उद्योग नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. याकरिता कंपनीचे मालक वा प्रतिनिधीचा आधार क्रमांक लागणार आहे. १ जुलै २०२० नंतर ईएम-२ या उद्योग आधार कार्डअंतर्गत नोंदणीकृत सर्व उद्योगांना उद्योग नोंदणी पोर्टलवर पुन्हा नोंदणी करावी लागेल. नोंदणीकृत सर्व उद्योगांना नवीन अधिसूचनेनुसार पुन्हा वर्गीकृत करण्यात येईल. ३० जून २०२० पूर्वी नोंदणीकृत उद्योग केवळ ३१ मार्च २०२१ पर्यंत मान्यताप्राप्त राहील. उद्योग नोंदणीकृत संख्येच्या उद्योगाला आयडेन्टीटी नंबर उद्योग पोर्टलमध्ये आपली माहिती ऑनलाईन अपडेट करता येईल. त्यामुळे गेल्या वित्तीय वर्षासाठी आयटीआर आणि जीएसटी रिटर्नचे विवरण आणि स्वयं घोषणेवर आवश्यक अन्य अतिरिक्त माहिती टाकावी लागेल. आॅनलाईन उद्योग नोंदणी पोर्टलमध्ये मर्यादित कालावधीत संबंधित माहिती अपडेट करण्यास अयशस्वी ठरलेल्या उद्योगाची नोंदणी रद्द होऊ शकते, असे शाह यांनी स्पष्ट केले.
नवीन अधिसूचनेनुसार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे वर्गीकरण गुुंतवणूक आणि उलाढाल या दोन मापदंडाच्या आधारावर होणार आहे. यामध्ये सूक्ष्म उद्योगासाठी संयंत्र आणि मशीनरी वा उपकरणांमध्ये गुंतवणूक एक कोटीपेक्षा जास्त नसावी व उलाढाल पाच कोटींपेक्षा जास्त असू नये. तर लघु उद्योगासाठी संयंत्र आणि मशिनरी वा उपकरणांमध्ये गुंतवणूक १० कोटींपेक्षा जास्त नसावी व उलाढाल ५० कोटींपेक्षा जास्त असू नये. याशिवाय मध्यम उद्योगासाठी संयंत्र आणि मशिनरी वा उपकरणांमध्ये गुंतवणूक ५० कोटींपेक्षा जास्त नसावी वा उलाढाल २०० कोटींपेक्षा जास्त असू नये. यामध्ये निर्यात उलाढालीचा समावेश होणार नाही. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग स्थापना करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्र अपलोड करण्यासह प्रतिज्ञापत्राच्या आधारावर उद्योग नोंदणी ऑनलाईन करता येते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्योग नोंदणी प्रमाणपत्र जारी होणार आहे. जर कोणताही उद्योग हे दोन्ही मापदंडाच्या श्रेणीचे उद्दिष्ट पार करीत असेल तर त्या उद्योगाला उच्च श्रेणीत ठेवण्यात येणार आहे.
नवीन उद्योगाच्या प्रकरणात जर आयटीआर उपलब्ध नसल्यास नोंदणी गुंतवणूक एन्टरप्राईजच्या प्रमोटरच्या स्वयंघोषणेच्या आधारावर होणार आहे. याप्रकारची सूट वित्तीय वर्ष ३१ मार्चनंतर समाप्त होईल. यामध्ये उद्योगाला पहिल्यांदा आयटीआर फाईल करावे लागेल. या संदर्भात काही तक्रार असल्यास एमएसएमई मंत्रालयाच्या चॅम्पियन पोर्टलवर मेल करून सोडविता येईल. त्यामध्ये एमएसएमई उद्योगाला मिळणाऱ्या लाभांची माहिती दिली जाईल, असे शाह यांनी स्पष्ट केले.

Web Title: Industry registration now mandatory for MSMEs: Zulfesh Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.